Gujrat Crime : गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी असा झाला खुलासा

Gujrat Crime : गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी असा झाला खुलासा
प्रातिनिधीक फोटो

गुजरातमधील डांग जिल्ह्यातील 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी तिघे अल्पवयीन आहेत. अहवा तालुक्यात राहणाऱ्या पीडितेला तिच्याच एका मित्राने तिला फसवले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 26, 2021 | 11:22 PM

गुजरात : गुजरातमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर 9 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने बलात्काराचा संपूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. घटनेच्या दोन महिन्यांनंतर हा व्हिडिओ मुलीच्या एका नातेवाईकाने पाहिला. त्यानंतर बलात्काराची घटना उघडकीस आली. तो व्हिडिओ पाहून नातेवाईकाला धक्काच बसला.

गुजरातमधील डांग जिल्ह्यातील 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी तिघे अल्पवयीन आहेत. अहवा तालुक्यात राहणाऱ्या पीडितेला तिच्याच एका मित्राने तिला फसवले आहे. शेजारच्या गावात एका लग्न समारंभाला ती त्याच्यासोबत गेली होती. या मित्रासोबत ती आपल्या गावी परतत असताना ही घटना घडली.

मित्रांनीच केला सामूहिक बलात्कार

पीडितेचे मित्र असलेले आठ मुलं वाटेत थांबली होती. पीडिता तिथून जात असताना तिच्या मित्रासह नऊ मुलांनी मिळून तिला रस्त्यालगतच्या जंगलात नेले. तेथे या लोकांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.

पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ आरोपींपैकी सहा आरोपी 20 ते 22 वयोगटातील आहेत. इतर तिघे अल्पवयीन आहेत. घटनेच्या वेळी त्या बाजूने काही लोक येत असल्याचे जाणवल्याने त्यांनी पीडितेला सोडून तेथून पळ काढला. वाटेत त्यांनी पीडितेला हा प्रकार कुठे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

व्हायरल व्हिडिओ नातेवाईकाने पाहिल्यानंतर घटना उघडकीस

बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ पीडितेच्या नातेवाईकापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी पीडितेच्या पालकाला याची माहिती दिली. यानंतर पीडितेचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले आणि 23 डिसेंबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर नऊ आरोपींना अटक करण्यात आली. यातील तीन अल्पवयीन आरोपींना जामीन मिळाला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Gang rape of a minor girl in Gujarat, Accussed arrest)

इतर बातम्या

Wardha : धक्कादायक! पत्नीनेच पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले, वर्ध्यातील आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें