AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidhu Moose Wala Murder : तिहारमध्ये बंद असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कस्टडी दिल्ली पोलिसांकडे; पाच दिवसांत करणार हत्येबाबत चौकशी होणार

मूसेवाला हत्येप्रकरणी, भटिंडा आणि फिरोजपूर तुरुंगात बंद असलेले दोन गुंड मनप्रीत सिंग आणि शरद यांना पंजाब पोलिसांनी 5 दिवसांच्या वॉरंटवर ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघेही शार्प शूटर आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सक्रिय सदस्य आहेत.

Sidhu Moose Wala Murder : तिहारमध्ये बंद असणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची कस्टडी दिल्ली पोलिसांकडे; पाच दिवसांत करणार हत्येबाबत चौकशी होणार
कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईImage Credit source: tv9
| Updated on: May 31, 2022 | 9:12 PM
Share

Sidhu Moose Wala Murder : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Punjabi singer and Congress leader Sidhu Muswala) यांच्या हत्या प्रकरणात मंगळवारी नवा ट्विस्ट आला आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईला 5 दिवसांच्या कोठडीत घेतलं आहे. यादरम्यान, स्पेशल सेल लॉरेन्स बिश्नोईकडून (Lawrence Bishnoi) सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी संबंधित रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. खरं तर, 29 मे रोजी संध्याकाळी 4.15 च्या सुमारास सिद्धू मुसेवाला, त्यांचा चुलत भाऊ गुरप्रीत आणि शेजारी गुरविंदर यांच्यासह त्यांच्या थार कारमधून मानसातील जवाहर गावातून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्यांना सिद्धूसोबत सुरक्षाही नव्हती. सुमारे 7 ते 8 बदमाशांनी सिद्धू मुसेवाला यांच्या कारला घेराव घातला आणि 30 ते 40 राऊंड फायर केले. ज्यामध्ये सिद्धू मुसेवाला यांचा गंभीर अवस्थेत मृत्यू झाला. तर कारमध्ये बसलेले इतर 2 लोक गंभीर जखमी झाले. या हत्याकांडानंतर काही मिनिटांतच या हत्याकांडाची जबाबदारी कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार (Goldie Brar) यांच्या अकाउंटवरून सोशल मीडियावरून घेण्यात आली होती.

मूसेवाला हत्येप्रकरणी, भटिंडा आणि फिरोजपूर तुरुंगात बंद असलेले दोन गुंड मनप्रीत सिंग आणि शरद यांना पंजाब पोलिसांनी 5 दिवसांच्या वॉरंटवर ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघेही शार्प शूटर आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. दरम्यान, पंजाबचे ADGP कायदा आणि सुव्यवस्था बदलल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता आयपीएस ईश्वर सिंह यांना नवे एडीजीपी बनवण्यात आले आहे.

बिश्नोईच्या जीवाला धोका

यापूर्वी तिहार तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलाने पटियाला कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेत वकिलाने लॉरेन्सची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाब पोलिसांचा तुरुंगात लॉरेन्सचा सामना होऊ शकतो किंवा विरोधी टोळ्या लॉरेन्सवर हल्ला करू शकतात, अशी भीती आहे, त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात यावी, असे वकिलाने सांगितले. तर मुसेवाला हत्याकांडाची योजना तिहार तुरुंगात रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पंजाबस्थित गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या फेसबुक पेजने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सिद्धूच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स आणि त्याचा भाऊ गोल्डी ब्रार घेतात, असे सांगण्यात आले.

लॉरेन्स बिश्नोईने सिद्धूला का मारले?

यामागील कारण म्हणजे 7 ऑगस्ट 2021 रोजी झालेला विक्की मिड्डूखेडा खून, ज्याचा बिश्नोई टोळीला बदला घ्यायचा होता, असे सांगितले जात आहे. विकी लॉरेन्सच्या जवळ होता. दविंदर बंबीहा टोळीने त्याची हत्या केली होती. बिश्नोई टोळीने सूड उगवलेल्या मिड्डुखेडा हत्याकांडात सामील असलेल्या नेमबाजांना मूसेवाला यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे.

तिहारमध्ये रचला कट!

तुम्हाला सांगतो, सध्या कला राणा आणि कला जथेडी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या ताब्यात आहेत. त्याला मकोका अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले जात आहे की, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट तिहार तुरुंगातच रचला गेला असावा. कारण कारागृहातच एक नंबर ट्रॅक करण्यात आला आहे, जो हत्येशी संबंधित आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.