पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला मारणारा गँगस्टर घाबरला, लॉरेन्स बिष्णोईला आता पोलीस देतायेत थर्ड डिग्री, जीवालाही भीती

पोलीस रिमांडमध्ये लॉरेन्सची चौकशी करताना अनेक कायद्यांचं उल्लंघन करण्यात येत असल्याचेही वकिलांचे म्हणणे आहे. लॉरेन्सला थर्ड डिग्री देण्यात येत असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. डॉक्टरांची टीम जेलमध्ये बोलवून मनमानी पद्धतीने त्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला मारणारा गँगस्टर घाबरला, लॉरेन्स बिष्णोईला आता पोलीस देतायेत थर्ड डिग्री, जीवालाही भीती
gangster bishnoi scared
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Jun 18, 2022 | 8:00 PM

चंदीगड– पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला हत्याकांडाची (Punjabi singer Sidhu Moosewala murder)जबाबदारी घेणारा गंगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi)आता सध्या स्वताच घाबरलेला आहे. त्याला आपल्या जीवाची भीती सतावते आहे. तिहार जेलमधून पंजाबमध्ये आणण्यात आलेल्या लॉरेन्सच्या वकिलांनी पंजाब पोलिसांवर (Punjab police)अनेक आरोप लावले आहेत. या प्रकरणात लॉरेन्सची चौकशी ऑन कॅमेरा होत नाही आणि लॉरेन्सला भेटू देत नाहीत, अशी तक्रार त्याचे वकील विशाल चोपडा यांनी केली आहे. आशील लॉरेन्स याच्या सुरक्षेसाठी कोर्टात जाणार असल्याचे वकील चोपडा यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस रिमांडमध्ये लॉरेन्सची चौकशी करताना अनेक कायद्यांचं उल्लंघन करण्यात येत असल्याचेही वकिलांचे म्हणणे आहे. लॉरेन्सला थर्ड डिग्री देण्यात येत असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. डॉक्टरांची टीम जेलमध्ये बोलवून मनमानी पद्धतीने त्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लॉरेन्सला १४ जूनला दिल्लीहून पंजाबमध्ये आणले

गँगस्टर लॉरेन्सला १४ जून रोजी दिल्लीच्या पटियाला कोर्टातून ट्रानिस्ट रिमांडद्वारे पंजाबात मनसा येथे आणण्यात आले आहे. यावेळी पंजाबचे ए़डव्होकेट जनरल त्यांच्या टीमसह कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी लॉरेन्सच्या सुरक्षिततेबाबत खात्री देण्यात आली होती.

लॉरेन्सला वकिलाविना कोर्टात केले सादर

लॉरेन्सला पंजाबात मनसा येथे आणल्यानंतर पोलिसांनी पहाटे चार वाजता दंडाधिकाऱ्यांच्या घरी हजर करण्यात आले होते. त्यावेळी लॉ़रेन्सची बाजू मांडणारा वकील त्या ठिकाणी नव्हता. त्यावेळी लॉरेन्सच्या वकिलांना संधी मिळाली नव्हती. त्यानंतर लॉरेन्सला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

लॉरेन्सला वकिलालाही भेटण्याची मनाई

लॉरेन्सला त्याच्या वकिलाला भेटण्याचीही परवानगी देण्यात येत नाहीये. गुन्हेगाराला असलेल्या हक्कांचे हे उल्लंघन असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. त्याच्यावर होत असलेल्या अत्याचारांना लपवण्यासाठी हे करण्यात य़ेत असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. लॉरेन्सला देण्यात येत असलेली वागणूक ही कायद्याचे उल्लंघन असून, याचे उत्तर पंजाब सरकारला कोर्टात द्यावे लागेल, असे वकिलांचे म्हणणे आहे. याबाबत कोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपीची रिमांडमध्ये चौकशी ऑनकॅमेरा व्हायला हवी मात्र तसे होत नसल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें