AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सबरीमाला मंदिरातून झाली सोन्याची चोरी ? केरळात खळबळ, विरोधीपक्षाने मागितला राजीनामा

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीने आज देखील केरळ विधानसभेत यावरुन गोंधळ घालत देवसोम बोर्ड मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज बंद पाडले.

सबरीमाला मंदिरातून झाली सोन्याची चोरी ? केरळात खळबळ, विरोधीपक्षाने मागितला राजीनामा
sabarimala
| Updated on: Oct 07, 2025 | 5:14 PM
Share

तिरुवनंतपुरम: केरळातील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातून सोन्याच्या चोरी झाल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या आघाडीने आज विधानसभेत या प्रकरणाचा मुद्दा उचलण्यासह देवसोम बोर्ड मंत्र्याचा राजीनामा करत लागोपाठ दुसऱ्या दिवशी केरळातील विधानसभेचे कामकाज गोंधळ घालून बंद पाडले. प्रश्नोत्तराचा तास सुरु होताच विरोधी पक्षांनी घोषणाबाजी करत या प्रकरणात चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षाचे नेते व्ही.डी. सतीसन यांनी देवस्वओम मंत्री व्ही.एन.वासवन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

केरळ हायकोर्टाचा निर्णय

सबरीमाला मंदिराच्या द्वारपालकाच्या मूर्तींच्या स्वर्ण आवरण आणि तांब्याच्या आवरणात कथित विसंगती आढळल्याने केरळ हायकोर्टाने सोमवारी या प्रकरणात चौकशीचे आदेश देत अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कायदा आणि सुव्यवस्था ) एच. व्यंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. हा तपास अतिरिक्त पोलीस महासंचालकच्या मार्गदर्शनाखाली त्रिशूरच्या केईपीएचे सहायक संचालक ( प्रशासन ), एस. शशिधरण (आयपीएस ) द्वारा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. हा तपास सहा आठवड्यात वेगाने करण्याचेही आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

का आहे वाद ?

सबरीमाला मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालकाच्या दगडाच्या मुर्तींवर तांब्याच्या पतऱ्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. यात अपहार केल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांना या प्रकरणात चोरी आणि दुरुपयोगाचा आरोप केला आहे. त्रावणकोर देवसोम बोर्डाने दुरुस्तीसाठी हे पॅनल हटवले होते. त्यांना उन्नीकृष्णन पोट्टी नावाच्या एका प्रायोजकाला सोपवण्यात आले होते. सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्याच्या प्लेटना पहिल्यांदा 2019 मध्ये दुरुस्तीसाठी हटवले होते. त्यावेळी प्रायोजक उन्नीकृष्णन पोट्टी यांच्याकडे त्या सोपवल्या होत्या. 39 दिवसांनंतर 38.258 किलोग्राम वजनाच्या या प्लेट परत करण्यात आल्या. त्यावेळी 4.541 किलोग्राम वजन कमी आढळले. सप्टेंबर 2025 वारंवार झीज होत असल्याचे सांगत बोर्डाने पुन्हा पॅनल हटवले.सबरीमालाचे विशेष आयुक्तांनी 9 सप्टेंबर रोजी हायकोर्टाला सांगितले की 2025 मध्ये त्यांना न्यायिक परवानगी शिवाय हटवले गेले होते. तपासानंतर 28 सप्टेंबर रोजी पोट्टी यांच्या बहिणीच्या तिरुवनंतपुरम येथील घरातून दोन प्लेट जप्त करण्यात आल्या.

बोर्डाचे स्पष्टीकरण

मात्र शनिवारी बोर्डाने स्पष्ट केले की हे पॅनल प्रायोजक उन्नीकृष्णन पोट्टी यांना कधीही दिलेले नव्हते.बोर्डाने म्हटले आहे की, “महाजरच्या मते, द्वारपालका मूर्तींच्या 14 सोन्याचा मुलामा असलेल्या पॅनल्सचे वजन 38 किलो होते, ज्यामध्ये 397 ग्रॅम सोने होते. दोन्ही पॅनल सबरीमालातच ठेवले गेले. तर उरलेले 12 एकूण वजन 22 किलोग्रॅम आणि 281 ग्रॅम सोन्याने मढवलेले दुरुस्तीसाठी पाठवले होते. चेन्नईतील स्मार्ट क्रिएशनने जीर्णोद्धारासाठी 10 ग्रॅम सोन्याचा वापर केला होता.हायकोर्टाच्या निर्देशानुसार पॅनल परत केले आहेत. 12 पॅनलामध्ये सोन्याचे प्रमाण वाढून 291 ग्रॅम झाले आहे. त्यामुळे 14 पॅनलचे एकूण सोन्याचे प्रमाण 397 ग्रॅमवरुन वाढून 407 ग्रॅम झाले आहे. 2019 मध्ये दुरुस्तीदरम्यान स्मार्ट क्रिएशन्स आणि प्रायोजक उन्नीकृष्णन यांनी 40 वर्षाची गॅरंटी दिली होती. त्यामुळे 2025 मध्ये त्यांनाच संपर्क करुन काम दिले.पॅनलचे सोने चोरीला गेल्याचा दावा बोर्डाने फेटाळला आहे.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....