AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? गोल्डी ब्रारने डॉक्यूमेंट्रीत सांगितले कारण

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.आता सिद्धू मूसेवालाच्या जीवनावर एक डॉक्यूमेंट्री तयार करण्यात आली आहे. यातून गोल्डी ब्रारने मूसेवालाची हत्या का केली हे समोर आले आहे.

सिद्धू मूसेवालाची हत्या का केली? गोल्डी ब्रारने डॉक्यूमेंट्रीत सांगितले कारण
Updated on: Jun 11, 2025 | 9:42 PM
Share

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हा जगभरात लोकप्रिय होता. मात्र २०२२ मध्ये त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येमागे बिष्णोई गँगचा हात असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. अशातच आता सिद्धू मूसेवालाच्या जीवनावर एक डॉक्यूमेंट्री तयार करण्यात आली आहे. यातून गोल्डी ब्रारने मूसेवालाची हत्या का केली हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बीबीसीने १० जून रोजी सिद्धू मूसेवालावरील डॉक्यूमेंट्री’द किलिंग कॉल’ चा दुसरा भाग प्रदर्शित केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मुसेवालाच्या मृत्यूचा दावा करणारा गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मूसेवालाची हत्या कशामुळे केली याबाबत माहिती दिली आहे. गोल्डी ब्रारने सिद्धू मूसेवालाच्या अशा २ चुका सांगितल्या आहेत, ज्यामुळे त्याला मूसेवालाची हत्या करावी लागली.

गोल्डी ब्रारने सिद्धू मूसेवालाची हत्या का केली?

सिद्धू मूसेवालाच्या हत्येबाबत डॉक्यूमेंट्रीत गोल्डी ब्रार म्हणाला,’अहंकाराने सिद्धू मूसेवालाने काही चुका केल्या ज्या कधीही माफ करता येणार नाहीत. सिद्धू मूसेवाला लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होता. मला माहित नाही की या दोघांना कोणी एकत्र आणले. मी कधीही विचारलेही नाही. पण मूसेवालाच्या हत्येपूर्वी दोघे खूप बोलत होते. तो लॉरेन्स बिश्नोईला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असे म्हणत असे.

सिद्धू मूसेवाला आणि लॉरेन्समधील दुरावा कधीपासून वाढला ?

गोल्डी ब्रारने दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोईची शत्रू असणारी टोळी बंबीहामुळे दोघांमधील दुरावा वाढला. बंबीहाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचे प्रमोशन केल्यामुळे मूसेवालावरील राग वाढला. त्याने आमच्या शत्रूंना प्रमोशन करायला सुरुवात केली. यामुळे लॉरेन्स आणि टोळीतील इतर सदस्य मूसेवालावर खूप रागावले होते. त्यांनी याबाबत सिद्धूला इशाराही दिला होता. ऑगस्ट २०२१ मध्ये मिद्दुखेरावासची हत्या झाल्यानंतर दुरावा वाढला.

गोल्डी ब्रार पुढे म्हणाला की, ‘या प्रकरणात सिद्धू मूसेवालाची भूमिका काय होती हे सर्वांना माहिती आहे. सिद्धू मूसेवालाची चौकशी करणाऱ्या पोलिसांना आणि पत्रकारांनाही याबद्दल माहिती आहे. सिद्धूने राजकीय शक्ती, पैसा आणि इतर मार्गांनी आमच्या शत्रूला मदत करत होता.’

आम्हाला त्याला शिक्षा द्यायची होती

आम्हाला सिद्धू मूसेवालाने केलेल्या चुकांची शिक्षा त्याला द्यायची होती. त्याच्यावर खटला दाखल करावा आणि तुरुंगात टाकण्याबाबत आम्ही याचिका दाखल केली होती, पण आमच्या याचिकेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्ही स्वतः न्याय केला. कायदा आणि न्याय असे काहीही नसते. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनाच न्याय मिळू शकतो. आमच्यासारख्या सामान्य लोकांना न्याय मिळू शकत नाही असं डॉक्यूमेंट्रीत गोल्डी ब्रार म्हणाला आहे.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.