युद्धविरामानंतर भारतासाठी आली गुडन्यूज, पाकिस्तान चीनचा होणार जळफळाट
अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली. युद्धविरामाच्या घोषणेनंतर भारतासाठी एक गुडन्यूज समोर आली आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा असा भ्याड हल्ला करण्याचा विचारही करणार नाही. भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला होता, पाकिस्तानने देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, त्यानंतर भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे, पाकिस्तानचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले.
दरम्यान त्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली. भारतानं आपल्या अटींवर युद्धविरामाची घोषणा केली आहे. पाकिस्तानला चीनकडून देखील मदत करण्यात आली, चीनकडून पाकिस्तानला युद्धसामग्री पुरवण्यात आली, मात्र ही सर्व शस्त्र भारताविरोधात कुचकामी ठरली आहेत.
दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे, भारतासाठी गुडन्यूज आहे. मात्र यामुळे चीन आणि पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट होणार आहे. सीआयआयनं वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या जीडीपीचा ग्रोथरेट 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशात सध्या उद्धभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था पुरेशी सक्षम असल्याचं सीआयआयचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे. आयएमएफकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला 100 कोटी डॉलरचं कर्ज देण्यात आलं आहे.
पाकिस्तान पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, पाकिस्तानवर केवळ आयएमएफचंच नाहीतर इतर विदेशी बँकांचं देखील कर्ज आहे. 1958 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने कर्ज घेतलं होतं, तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 24 वेळा पाकिस्तानने आयएमएफकडे कर्जासाठी हात पसरले आहेत. पाकिस्तानवर सध्या स्थितीमध्ये तब्बल 30 बिलियन डॉलरचं कर्ज आहे, आणि विशेष म्हणजे पुढील दोन वर्षांमध्ये त्यांना हे कर्ज फेडावं लागणार आहे. मात्र सध्याची पाकिस्तानची परिस्थिती पाहाता हे शक्य वाटत नाही.
