भारतासाठी गुडन्यूज, टॅरिफ दबावात घेतली मोठी झेप, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, या टॅरिफचा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र हे सर्व अंदाज चुकीचे ठरले असून, मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात. या पैशांचा वापर रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात फंड म्हणून करत आहे, त्यामुळे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम होत नसल्याचा आरोप देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा मोठा परिणाम हा भारताच्या जीडीपीवर होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता, मात्र हे सगळे अंदाज साफ चुकल्याचं आता समोर आलं आहे. जीडीपीची आकडेवारी समोर आली असून, भारतानं मोठी झेप घेतल्याचं दिसून येत आहे.
जीडीपीच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी तब्बल 8.2 टक्के एवढ्या वेगानं वाढला आहे. गेल्या सहा महिन्यातील हा रेकॉर्ड ब्रेक ग्रोथ रेट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था, देशांतर्गत मालाला वाढलेली मागणी आणि सरकारच्या विविध योजना या सर्वांचा एकत्रित हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. मागच्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपीचा ग्रोथ रेट हा 7.8 टक्के होता, त्यामध्ये आता मोठी वाढ झाली असून, चालू तिमाहीमध्ये तो 8.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. चालू तिमाहीमध्ये हा रेट सात टक्के इतका राहू शकतो असा आरबीआयचा अंदाज होता, मात्र जीडीपीनं हा अंदाज देखील चुकवला आहे, अपेक्षेपेक्षा जीडीपीचा ग्रोथ रेट अधिक राहिला आहे.
सरकारकडून जीएसटीच्या स्लॅबमध्ये करण्यात आलेली कपात, सण उत्सवाचा काळ देशांतर्गत पातळीवर उत्पादनाला वाढलेली मागणी आणि मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे जीडीपीचा ग्रोथ रेट या तिमाहीमध्ये जास्त राहिल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भारतासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर देखील भारतानं मोठी झेप घेतली आहे. दुसरीकडे निर्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेसोबतच्या निर्यातीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे.
