GST: महागाईच्या झळा! जीएसटीमुळे आजपासून नेमकं काय काय महागलं? वाचा संपूर्ण यादी

पॅकबंद व लेबल लावलेल्या पदार्थांची विक्री आता जीएसटीसह होणार असून याचा थेट परिणाम डेअरी उत्पादकांवर होणार आहे. आजपासून डेअरी पदार्थ महागणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडणार आहे. सर्वसामान्य नागरिक यामुळे संतापले आहेतच पण व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे.

GST: महागाईच्या झळा! जीएसटीमुळे आजपासून नेमकं काय काय महागलं? वाचा संपूर्ण यादी
नितीश गाडगे

| Edited By: रचना भोंडवे

Jul 18, 2022 | 6:31 AM

महागाईच्या (Inflation) झळा वाढतच चालल्या आहेत. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. असे असतानाच नागरिकांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. जीएसटी परिषदेने (GST Council) खाद्यांन्न व अन्नधान्य जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या 47 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पॅकबंद दही, लस्सी, ताक, ( Yogurt, buttermilk) खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य इत्यादी पदार्थांवर जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच बँक चेकबुक, नकाशे, ॲटलास इत्यादी वस्तूही जीएसटीच्या कक्षेत येतील. पॅकबंद व लेबल लावलेल्या पदार्थांची विक्री आता जीएसटीसह होणार असून याचा थेट परिणाम डेअरी उत्पादकांवर होणार आहे. आजपासून डेअरी पदार्थ महागणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडणार आहे. सर्वसामान्य नागरिक यामुळे संतापले आहेतच पण व्यापाऱ्यांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या वस्तू होणार महाग ?

  1. पॅकबंद पदार्थ – पॅकबंद व लेबल लावलेले मांस, मासे, दही, लस्सी, पनीर, मध, तसेच गहू या पदार्थांवर आता 5 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू होईल. मात्र जे सामान सुटे, लेबल लावलेले नसेल आणि ब्रांडेड नसेल त्यांच्यावर जीएसटी लावण्यात येणार नाही.
  2. बॅंक चेकबुक – बँकेचे चेक अथवा चेकबुक यावर आताा 18 टक्के जीएसटी लागू होईल, त्यामुळे आता चेकबुकही महागणार आहे.
  3. हॉटेल रूम – ज्या हॉटेल रुमचे दिवसाचे भाडे 1000 रुपये असेल त्यावरही जीएसटी परिषदेने 12 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी यावर कोणताही कर लागू होत नव्हता.
  4. LED लाइट्स, लॅम्प – रोजच्या वापरातील LED दिवे, लॅम्प्स यांच्या किमतीही आता महागणार आहेत. जीएसटी परिषदेने या वस्तूंवर 18 टक्क कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा कर 12 टक्के होता.
  5. चाकू – कटिंग ब्लेड, पेपर नाइफ, पेन्सिलीचे टोकयंत्र ( शार्पनर) इत्यादी वस्तूंवरही 18 टक्के जीएसटी लागू होईल. याआधी या वस्तूंवरील कर 12 टक्के होता.
  6. पंप आणि मशीन – पाण्याचे पंप आणि सायकलचे पंप यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून वाढवून 18 टक्के करण्यात आला आहे. साफसफाई लागणारे मशीन, पवनचक्की इत्यादींवरील जीसटीही 18 टक्के करण्यात आला आहे. आधी त्यावर 12 टक्के जीएसटी लागू होता.

या गोष्टी होणार स्वस्त

  • डिफेन्स आयटम्स – संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही गोष्टींवरील करात सूट देण्यात आली आहे.
  • रोपवे राइड – रोपवे राइडवर लावण्यात आलेला 18 टक्के जीएसटी आता 5 टक्के करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें