Gujarat Assembly Election 2022 : आरंभ है प्रचंड! गुजरात विधानसभेची निवडणूक 1 आणि 5 डिसेंबरला; कसा आहे निवडणूक कार्यक्रम? वाचा एका क्लिकवर

गुजरातमध्ये एकूण 51782 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात 142 मॉडल पोलिंग केंद्र असणार आहेत. महिलांसाठी 1274 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत.

Gujarat Assembly Election 2022 : आरंभ है प्रचंड! गुजरात विधानसभेची निवडणूक 1 आणि 5 डिसेंबरला; कसा आहे निवडणूक कार्यक्रम? वाचा एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 12:42 PM

नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujarat Assembly Election 2022) कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाचे (election commission) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज आकाशवाणी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार गुजरातमध्ये (Gujarat) येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी लागणार आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीही उतरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लग लागलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला गुजरातमधील मोरबी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. त्यानंतर त्यांनी मुख्य विषयाला हात घातला. गुजरातमध्ये एकूण 49089765 मतदार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या निवडणुकीत हे सर्व मतदार मतदान करण्यात पात्र असल्याचंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

राज्यातील 3.24 लाख मतदार पहिल्यांदाच गुजरात विधानसभेसाठी मतदान करणार आहेत. राज्यात 4.6 लाख तरुण मतदार आहेत. तसेच राज्यात 9.89 लाख ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

गुजरातमध्ये एकूण 51782 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात 142 मॉडल पोलिंग केंद्र असणार आहेत. महिलांसाठी 1274 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. तर दिव्यांगांसाठी 182 पोलिंग केंद्र तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी पहिल्यांदाच शिपिंग कंटेनर पोल बुथ म्हणून तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक उमेदवाराला आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगावी लागणार आहे.

तसेच निवडणुकी संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर तक्रार केल्यानंतर अवघ्या 100 मिनिटात त्याचं उत्तर मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

निवडणूक आयोगाने यावेळी तरुणांना अधिकाधिक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तरुणांनी मतदानासाठी पुढे यावं, सर्वांनीच मतदान करावं, असं आवाहन आयोगाने केलं आहे.

असा आहे गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम

अर्ज भरण्याची तारीख : 14 नोव्हेंबर

अर्ज छाननीची तारीख : 15 नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर

मतदानाचा पहिला टप्पा : 1 डिसेंबर

मतदानाचा दुसरा टप्पा : 5 डिसेंबर

निवडणुकीचा निकाल : 8 डिसेंबर

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.