गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; खासदार मनसुख वसावा यांचा पक्षाला रामराम

मनसुख वसावा येथे भरूच मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मनसुख वसावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. | Mansukh Vasava

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; खासदार मनसुख वसावा यांचा पक्षाला रामराम

अहमदाबाद: गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनसुख वसावा (Mansukh Vasava) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसुख वसावा येथे भरूच मतदारसंघाचे खासदार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मनसुख वसावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. याच नाराजीतून वसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. (controversial bjp mp mansukh vasava resigns)

मनसुख वसावा यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. माझ्या चुकीमुळे पक्षाला फटका बसत आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे वासवा यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. भाजपने मला खूप काही दिले. माझी आजपर्यंतची वाटचाल पक्षाची मूल्य आणि आदर्शाला अनुसरून होती. मी एक सामान्य माणूस आहे. मात्र, आदिवासींशी संबंधित असलेल्या काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत असलेल्या मतभेदांमुळे आपण भाजपमध्ये राहू शकत नाही, असेही वसावा यांनी म्हटले. भाजपची साथ सोडल्यानंतर आता वसावा कोणत्या पक्षात जाणार,याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मनसुख वसावांनी का राजीनामा दिला?

गुजरातमधील आदिवासी गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (eco sensitive zone) परिसरात समावेश केल्याच्या कारणावरून वसावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच गुजरात सरकारने नर्मदा जिल्ह्यातील 121 गावांचा eco sensitive zone मध्ये समावेश केला होता. मनसुख वसावा यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते आपल्या लोकसभा सदस्यत्त्वाचाही राजीनामा देणार असल्याचे समजते.

मनसुख वसावा यांचे वादग्रस्त विधान

काही दिवसांपूर्वी खासदार मनसुख वसावा यांनी मतदार हे पैसे आणि दारुच्या बाटल्या दिल्यावर विकले जातात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे प्रामाणिक उमेदवार निवडून येत नाही. यापूर्वीही वसावा यांनी नर्मदा, वापी, नवसारी आणि वळसाड या जिल्ह्यांतील अवैध दारुविक्रीच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. एरवीही वसावा हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीच ओळखले जातात.

संबंधित बातम्या:

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत

आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राष्ट्रवादीचा धमाका, अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ

(controversial bjp mp mansukh vasava resigns)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI