VIDEO | गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले, रक्तदाब कमी झाल्याने आली भोवळ

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी चक्कर आल्यामुळे स्टेजवरच कोसळल्याची घटना घडली. (Gujarat Chief Minister Vijay Rupani collapsed)

VIDEO | गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले, रक्तदाब कमी झाल्याने आली भोवळ
विजय रुपाणी अशा प्रकारे कोसळले.

गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Gujarat Chief Minister Vijay Rupani) चक्कर आल्यामुळे स्टेजवरच कोसळल्याची घटना घडली. सध्या वडोदरा महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते निजामपुरा येथे प्रचासभेत बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांना चक्कर आली आणि ते स्टेजवरच कोसळले. (Gujarat Chief Minister Vijay Rupani collapsed on the stage due to dizziness)

विजय रुपाणी कोसळतानाचा व्हिडीओ पाहा :

सध्या गुजरातमध्ये काही शहरांच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येथे राजकीय वातावरण तापलेले आहे. येथे वेगवेगळ्या पक्षांकडून जोरदार प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत. भाजपकडूनसुद्धा येथे जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपतर्फे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भाषणे आयोजित केली जात आहेत. यावेळी वडोदरा येथील निजामपुरा भागात त्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी  प्रचारसभेत बोलत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि भाषण सुरु असतानाच ते अचानकपणे कोसळले. डॉक्टरांनी सागितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे ते कासळले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी

हौसेला मोल नाही, भिवंडीच्या शेतकरी उद्योजकाकडून चक्क हेलिकॉप्टर खरेदी

गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय ‘ही’ तरुणी

(Gujarat Chief Minister Vijay Rupani collapsed on the stage due to dizziness)

Published On - 10:57 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI