ज्योती मल्होत्राच्या मनात दडलेलं बाहेर आलंच, बाप भेटायला जाताच…काय सांगितलं?
ज्योती मल्होत्रा सध्या तुरुंगात आहे. तिच्या वडिलांनी तिची भेट घेतली असून वडिलांकडे तिनं मन मोकळं केलं आहे.

Jyoti Malhotra : प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या आरोपाखील अटक करण्यात आलं आहे. भारताच्या वेगवेगवळ्या तपास संस्था तिची कसून चौकशी करत आहेत. पाकिस्तानला भारताविषयी संवेदनशील माहिती पुरवल्याचा तिच्यावर आरोप आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी तुरुंगात जाऊन तिची भेट घेतली आहे. तुरुंगात तिने वडिलांना नेमकं काय सांगितलं हे आता समोर आलं आहे.
12 टीबी डेटा जप्त
ज्योती मल्होत्राला ताब्यात घेतल्यानंतर तिची सध्या कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली होती. यात तिचा लॅपटॉप, मोबाईल तसेच इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. आता तपास संस्थांनी यातून तब्बल 12 टीबी डेटा जप्त केल्याचं समोर आलं आहे. या डेटामध्ये कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंग, कॉल डिटेल्स, पैशांचे व्यवहार तसेच इतर माहिती आहे. यातूनही ज्योती मल्होत्राचं पाकिस्तानशी नेमकं कनेक्शन काय आहे, हे समोर येण्यास मदत होणार आहे.
ज्योतीचे वडील गेले भेटीला
ज्योती मल्होत्राच्या वडिलांचे नाव हरिश मल्होत्रा असे आहे. सध्या ज्योती हिसारच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. याच तुरुंगात जाऊन हरिश मल्होत्रा यांनी ज्योती मल्होत्राची भेट घेतली आहे. या भेटीत ज्योतीने तिच्या वडिलांसमोर तिची बाजू मांडली आहे.
ज्योतीने वडिलांना काय सांगितलं?
हरिश मल्होत्रा तिला भेटायला गेल्यानंतर ज्योतीने त्यांच्याजवळ आपलं मन मोकळं केलं आहे. मी काहीही केलं नाही. मी निर्दोष आहे. माझी काहीही चूक नाही, असं ज्योतीने हरिश यांना सांगितलं आहे. तशी माहिती खुद्द हरिश यांनी माध्यमांना दिली आहे. ज्योती मल्होत्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तेव्हा तिला 4 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आणखी 14 दिवसांची कोठडी तिला सुनावण्यात आली.
नवा व्हिडीओ आला समोर
दरम्यान, ज्योती मल्होत्राचा नुकातच एक व्हिडीओ समोर आला आहे. तीय या व्हिडीओमध्ये लाहोर शहरात ब्लॉग करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तब्बल 6 अंगरक्षक तिचे रक्षण करताना दिसत आहेत. या सर्व अंगरक्षकांच्या हातात एके 47 बंदूक असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतरही वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
