कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने देशभरातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला होता. (Harsh Vardhan met Health Minister of states, reviewed Covid-19 vaccination drive)

कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं
Dr. Harsh Vardhan
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 5:29 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने देशभरातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा नव्या जोमाने कोरोना लसीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे संकेतच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. (Harsh Vardhan met Health Minister of states, reviewed Covid-19 vaccination drive)

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आठ राज्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी या महिन्यातच 8 कोटी व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. तसेच जूनमध्ये 9 कोटी डोस मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा आणि तेलंगना राज्यांच्या प्रतिनिधींचा या बैठकीत समावेश होता.

14 मे रोजी मिळणार डिटेल्स

कोरोना लसींचा साठा हळूहळू उपलब्ध होईल. ज्यांना पहिला डोस मिळालेला आहे. त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे. या लोकांचं लसीकरण अर्धवट ठेवता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच 30 एप्रिल रोजी राज्यांना येत्या 15 दिवसात व्हॅक्सिन मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार 14 मे रोजी पुढच्या 15 दिवसात किती आणि केव्हा व्हॅक्सीन मिळेल हे सांगण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आजवरचं लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत 17.52 कोटी लस देण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी 7 वाजेच्या रिपोर्टनुसार 25,47,534 सत्रांसाठी 17,52,35,991 डोस देण्यात आले आहेत. यात 95,82,449 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65,39,376 कामगारांना दुसरा डोस देण्यात आला. त्याशिवाय 45 ते 60 वयोगटातील 5,58,83,416 व्यक्तिंना पहिला डोस आणि 78,36,168 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. तर ज्येष्ठ नागरिकांना 5,39,59,772 पहिला डोस आणि 1,62,88,176 ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 24.4 लाखाहून अधिक लस देण्यात आली. लसीकरणाच्या116 व्या दिवशी (11 मे रोजी) 24,46,674 डोस देण्यात आले.

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 99 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Harsh Vardhan met Health Minister of states, reviewed Covid-19 vaccination drive)

संबंधित बातम्या:

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, बळींचा आकडाही 4200 पार

हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा भारतात उगम, अफवा की सत्य ? केंद्र सरकारनं दिली खरी माहिती

लग्नानंतर काही तासातच नववधूचा मृत्यू, वरातीऐवजी अंत्ययात्रा, नवरदेवाकडून मुखाग्नी

(Harsh Vardhan met Health Minister of states, reviewed Covid-19 vaccination drive)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.