Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, बळींचा आकडाही 4200 पार

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेला आहे. (New Corona Cases India )

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, बळींचा आकडाही 4200 पार
Corona
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 9:56 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 19 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 48 हजार 421 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 205 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला होता (New 348421 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर सलग दोन दिवस कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 48 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 205 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 338 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 33 लाख 40 हजार 938 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 54 हजार 197 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 99 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 52 लाख 35 हजार 991 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,48,421

देशात 24 तासात मृत्यू – 4205

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,55,338

एकूण रूग्ण – 2,33,40,938

एकूण मृत्यू – 2,54,197

एकूण डिस्चार्ज – 1,93,82,642

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,04,099

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -17,52,35,991

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती (New Corona Cases India )

संबंधित बातम्या :

देशात प्रवासासाठी RT_PCR टेस्ट बंधनकारक नाही, विना टेस्ट रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

ठाण्यातही ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र, कुठे सोय? नियम आणि अटी काय?

(New 348421 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.