AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काऊंटडाऊन सुरू, जम्मू-काश्मीर, हरियाणा निवडणूकीचे निकाल आज, पाहा प्रत्येक अपडेट

जम्मू आणि काश्मीरातून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूका पार पाडल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही विधानसभाचे निकाल आज लागणार आहेत. या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुम्हाला येथे वाचायला मिळेल.

काऊंटडाऊन सुरू,  जम्मू-काश्मीर, हरियाणा निवडणूकीचे निकाल आज, पाहा प्रत्येक अपडेट
haryana and j&k election date
| Edited By: | Updated on: Oct 08, 2024 | 7:45 AM
Share

जम्मू-काश्मीर, हरियाणा येथे विधानसभा निवडणूकांसाठी नुकतेच मतदान झाले. दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.  सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीची सुरुवात होणार आहे. जम्मू – काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच निवडणूका होत आहेत. त्यामुळे या निवडणूकांना महत्व आले आहे.

8 ऑक्टोबर रोजी विधानसभांचा निकाल

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूका पार पडल्या होत्या.एक ऑक्टोबरला शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले. तर हरियाणात विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. मतदानानंतर विविध संस्थाचे एक्झिट पोल देखील जाहीर झाले आहेत. यात दोन्ही राज्यात कोणाचे सरकार येणार याचा अंदाज सांगितला आहे. परंतू हे केवळ अंदाज असून खरे निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहेत. त्यामुळे त्यादिवसापर्यंत उत्सुकता ताणली आहे.

येथे पाहा निवडणूक निकालांचे अपडेट

दोन्ही राज्यात आज अर्थात 8 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, पोस्टल बॅलेट मोजणी होणार आहे. याचा वापर दिव्यांग, संरक्षण दले आणि काही सरकारी अधिकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करतात. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होईल. हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर येथे कोणते सरकार येणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.टीव्ही 9 चॅनलच्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व निकालाचे ताजे अपडेट मिळतील.

हरियाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या जागा

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरसाठी मतदान झाले होते. तर जम्मू – काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. जम्मू आणि काश्मीरसाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरचे कलम 370 हटविल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे.

कलम 370 हटवल्यानंतरची निवडणूक

जम्मू आणि काश्मीर येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने एकत्र निवडणूका लढविल्या आहेत. तर पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी आणि भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढली आहे. हरयाणात बीजेपी, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी मुख्य लढत होत आहे. तसेच नॅशनल लोक दल-बहुजन समाज पार्टी (INLD-BSP) आणि जननायक जनता पार्टी (JJP)-आझाद समाज पार्टी (ASP) यांच्या निवडणूक पूर्व आघाडी झालेली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.