Vikramditya Singh Second Marriage : कंगनाकडून हरलेला नेता, मंत्र्याचं आज दुसरं लग्न, त्याची होणारी बायको अमरीन कोण आहे?
Vikramditya Singh Second Marriage :17 ऑक्टोंबर 1989 रोजी विक्रमादित्य सिंह यांचा जन्म झाला. ते वडिल वीरभद्र सिंह यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. विक्रमादित्य सिंह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. विक्रमादित्य सिंह यांचं पहिलं लग्न 2019 मध्ये राजस्थान आमेटची राजकुमारी सुदर्शना चुंडावतशी झालं होतं.

लोक निर्माण आणि शहर विकास मंत्री विक्रमादित्य सिंह आपल्या व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ते दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत. आत चंदीगड येथे विक्रमादित्य यांचं लग्न होणार आहे. विक्रमादित्य सिंह यांच्या होणाऱ्या पत्नीच नाव अमरीन सेखो आहे. अमरीन आणि विक्रमादित्य आधीपासून परस्परांना ओळखतात. त्यांच्या जुनी मैत्री आहे. विक्रमादित्य सिंह यांचं निवासस्थान होलीलॉज विवाह सोहळ्यासाठी सजवण्यात आलं आहे. लग्नानंतर 24 सप्टेंबरला सिमल्याच्या हॉटेल मरीना येथे रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे. या रिसेप्शन पार्टीमध्ये काही जवळचे लोक सहभागी होतील. विक्रमादित्य सिंह हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.
विक्रमादित्य सिंह यांच्या होणाऱ्या पत्नी अमरीन एक प्रोफेसर आहेत. त्यांनी इंग्लिश आणि साइकोलॉजीमध्ये डबल मास्टर्स केलय. त्याशिवाय सायकोलॉजीमध्ये पीएचडी सुद्धा केलीय. अमरीन पंजाब यूनिवर्सिटीमध्ये असिसटेंट प्रोफेसर आहेत. अमरीनचा संबंध एका शीख कुटुंबाशी आहे. त्यांच्या पित्याच नाव सरदार जोतिंदर सिंह सेखो आणि आईच नाव ओपिंदर कौर आहे. अमरीनने हार्वर्ड यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेतलय.
कंगनाकडून हरले
17 ऑक्टोंबर 1989 रोजी विक्रमादित्य सिंह यांचा जन्म झाला. ते वडिल वीरभद्र सिंह यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. विक्रमादित्य सिंह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते सिमला ग्रामीण विधानसभा क्षेत्राच प्रतिनिधीत्व करतात. मंत्रिमंडळात ते लोक निर्माण आणि शहरी विकास विभागाची जबाबदारी संभाळतात. वर्ष 2024 मध्ये विक्रमादित्य सिंह यांनी मंडीमधून अभिनेत्री कंगना रणौतला आव्हान दिलं होतं. पण निवडणुकीत कंगनाने त्यांना पराभूत केलं होतं.
नॅशनल लेवलवर ट्रॅप शूटर राहिलेत
विक्रमादित्य सिंह यांचं पहिलं लग्न 2019 मध्ये राजस्थान आमेटची राजकुमारी सुदर्शना चुंडावतशी झालं होतं. पण काही घरगुती मतभेदांमुळे हे नात फार टिकू शकलं नाही. नोव्हेंबर 2024 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी अमरीनसोबत लग्नाचा विचार केला. राजकारणाशिवाय विक्रमादित्य यांना स्पोर्टसमध्ये सुद्धा रुची आहे. नॅशनल लेवलवर ते ट्रॅप शूटर होते. 2007 साली ब्रॉन्ज मेडलही जिंकलेलं. त्यांचं शिक्षण सिमल्याच्या बिशप स्कूल आणि दिल्ली यूनिवर्सिटीच्या हंसराज कॉलेजमधून झालय.
