भारतानं ऑपरेश सिंदूर कसं राबवलं? जाणून घ्या A टू Z माहिती
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, भारताच्या या कारवाईमुळे दहशतवादाचं कंबरडं मोडलं आहे.

22 एप्रिलला पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामागे धार्मिक हिंसाचार भडकवण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्टपणे दिसून येतो. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली.
भारतानं सर्वात आधी सिंदू नदी जल कराराला स्थगिती दिली, त्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले, त्यांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला, तसेच भारताकडून आयात -निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली, पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला. भारताकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, पाकिस्तानच्या नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या देणं या काळात सुरू होतं. तर दुसरीकडे भारतानं दहशतवादाविरोधात मोठा निर्णय घेतला, ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं.
सहा मे रोजी सायंकाळी भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमधील दहशतवादाचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानमधील नागरिक अथवा सैन्य तळ यांना धक्का न लावता अचूक पणे फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे, दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे हाच उद्देश या ऑपरेशन सिंदूरमागे भारताचा होता, भारतानं ऑपरेश सिंदूर यशस्वीपणे राबवलं. भारतानं ऑपरेशन सिंदूर आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे हेरले, आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली.
दरम्यान ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरल्यानंतर भारतीय लष्कराची सात मे रोजी एक पत्रकार परिषद देखील पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरचा नेमका काय उद्देश होता हे स्पष्ट करण्यात आलं, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली, तसेच भारत कोणत्याही भागामध्ये हल्ला करण्यास सक्षम आहे हे देखील पाकिस्तानला कळून चुकलं. भारतानं पाकिस्तानी नागरिक किंवा सैन्याला धक्क न लावता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अचूकपणे फक्त दहशतवादी अड्ड्यांचा वेध घेतला.
