AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएमच्या पर्सनल सेक्रेटरीची निवड कशी होते? किती पगार आणि सुविधा असतात ?

पीएमच्या पर्सनल सेक्रेटरी बनणे एक टॉप लेव्हलचा एडमिनिस्ट्रेटीव्ह रोल आहे. सर्वात विश्वासार्ह आणि अनुभवी अधिकाऱ्यांना हे पद सांभाळायला दिलेले असते. या पदाची निवड कशी होते, काय काम आणि वेतने असते ? पाहूयात..

पीएमच्या पर्सनल सेक्रेटरीची निवड कशी होते? किती पगार आणि सुविधा असतात ?
pm modi
| Updated on: Nov 18, 2025 | 8:30 PM
Share

पंतप्रधानांचा पर्सनल सेक्रेटरी या पदाविषयी सर्वांना औत्सुक्य असते.परंतू ही सर्वसाधारण नोकरी नाही. देशातील सर्वात मोठ्या कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालयात (PMO) पर्सनल सेक्रेटरी याचा जॉब असतो. सध्या 2014 बॅचचे IFS अधिकारी निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल सेक्रेटरी आहेत. पर्सनल सेक्रेटरी पद कसे भरले जाते ? ते काय काय काम करतात आणि त्यांना किती पगार मिळतो हे पाहूयात…

पंतप्रधानांचा खाजगी सचिव कोण होतो?

पंतप्रधानांचा पर्सनल सेक्रेटरी पंतप्रधानांचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्यास मदत करतो.ही व्यक्ती पीएमचे शेड्युल, मिटींग्स, दौरे, फाईल्स, सरकारी विभागातून येणारी माहिती आणि मोठ्या निर्णयांची तयारी आणि संपूर्ण समन्वयाचे काम करत असतो. हे काम क्लार्क किंवा सहायकाचे नसते तर टॉप लेव्हलचे एडमिनिस्ट्रीव्ह जबाबदारी आहे.

पीएमचा पर्सनल सेक्रेटरी काय-काय काम करते ?

1. पंतप्रधानांचे प्रत्येक मिनिटांचे शेड्युल, प्रत्येक फाईल, प्रत्येक मिटींगला सांभाळणे

2. कोण भेटणार आहे , केव्हा बैठक आहे , कोणत्या विषयावर बोलणी होणार, सर्व काही हे निश्चित करतात.

3.प्रत्येक मंत्रालयातून येणारा अहवाल आणि डॉक्युमेंट पीएमपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी

4. देश-विदेशाची बैठका आणि दौऱ्यांचा प्लान तयार करणे

5. पीएमपर्यंत योग्य माहिती पोहचवणे आणि त्यांच्या निर्णयांना पुढे नेणे या पदाची मोठी जबाबदारी आहे.

6. गोपनीय प्रकरणे सुरक्षित ठेवणे

7. आपत्ती, राष्ट्रीय संकट वा आपात्कालीन परिस्थितीत योग्य भूमिका निभावणे

पीएमचे पर्सनल सेक्रेटरी कसे निवडले जातात –

ही जबाबदारी त्याच ऑफीसरना दिली जाते ज्यांच्याकडे प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव, सरकारच्या कामकाजाची चांगली समज आणि हाय लेव्हलची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता असायला हवी. या पदासाठी सर्वसाधारण पणे IAS, IFS वा IRS सारख्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी निवडले जातात. ज्यांच्याकडे 15-20 वर्षांचा अनुभव असेल ज्यांना मोठे प्रशासकीय निर्णय, धोरणे आणि सरकारी सिस्टीमध्ये मोठी भूमिका निभावली असेल, जे गुप्त आणि संवेदनशील प्रकरणे संपूर्ण सर्तकपणे सांभाळू शकतील. म्हणजे सर्वात विश्वासार्ह आणि टॉप क्लासचे अधिकाऱ्यांना हे पद मिळते.

पीएमच्या पर्सनल सेक्रेटरीला वेतन किती असते ?

या पदावर सर्वसाधारणपणे वरिष्ठ IAS-IFS अधिकारी असतात. त्यासाठी त्यांचे वेतनही त्यांच्या रँक नुसार असते. त्यांची सरासरी सॅलरी 1.5 लाख ते 2.5 लाख महिना असते. याशिवाय त्यांना सरकारी घर, कार, सिक्युरिटी, मेडिकल सुविधा आणि अधिकृत परदेश प्रवासाचे फायदे आणि विशेष फायदे मिळतात.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.