ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकिस्तानची मदत करणं पडलं भारी, त्या दोन देशांना भारतानं शिकवला चांगलाच धडा, मोठी बातमी समोर
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते, या काळात तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला मदत केल्याचं समोर आलं होतं.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, शंभर पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले, भारतानं या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नावं दिलं होतं. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला, आणि पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र या काळात पाकिस्तानला पाकिस्तानचे मित्र राष्ट्र असलेले तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी मोठी मदत केली होती, मात्र त्यानंतर आता भारतीय नागरिकांनी या दोन्ही देशांना चांगलाच धडा शिकवला आहे.
या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात तेथील पर्यटनावर अवलंबून आहे, दरवर्षी हजारो भारतीय पर्यटक या दोन देशांमध्ये पर्यटनासाठी जात असतात, मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर या दोन्ही देशाच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला असून, भारतीयांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार ऑपरेशन सिंदूरनंतर अझरबैजानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येमध्ये तब्बल 56 टक्के घट झाली आहे. तर तुर्कीमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 33.33 टक्क्यांनी घटली आहे. ऑपरेशन सिंदूरपूर्वी अझरबैजान आणि तुर्कीमध्ये जाणाऱ्या पर्यटकांचा आकडा सातत्यानं वाढतच होता, मात्र त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.
याची मोठी किंमत या दोन देशांना आता मोजावी लागत आहे, तेथील पर्यटन व्यावसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे, तसेच ऑपरेशन सिंदूरपूर्वी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं चित्रिकरण हे तुर्कीमध्ये होत होतं, मात्र आता बॉलिवूडने देखील तुर्कीवर बहिष्कार घातल्यानं त्यांना कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. पर्यटकांची संख्या कमी झाल्यानं त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरला बसला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन दिल्याचे उघड झाले आहे, तसेच या काळात तुर्कीच सैन्य पाकिस्तानात होतं. यापूर्वी देखील अनेकदा जम्मू -काश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कीने उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली आहे.
