AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीची चाल, पत्नीच्या जिव्हारी, भावजीला पडला महागात पंगा, मेव्हणीने दाखवला इंगा

Assembly Election 2023 | राजस्थानमध्ये भाजप सत्तेत येणार हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात अनेकदा अनाकलनीय सामने रंगतात. राजस्थानमध्ये पण असेच दोन सामने रंगले. पती आणि पत्नी, भावजी आणि मेव्हणीत चकमक झाली. पतीमुळे पत्नीला पराभवाचे तोंड पहावे लागले तर दुसरीकडे मेव्हणीने भावजीच टोपी उडवली.

पतीची चाल, पत्नीच्या जिव्हारी, भावजीला पडला महागात पंगा, मेव्हणीने दाखवला इंगा
| Updated on: Dec 03, 2023 | 5:30 PM
Share

जयपूर | 3 डिसेंबर 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. तर काही हटके सामन्यांनी एकूणच निवडणुकीत रंगत आणली. अनेकदा आपण एकाच मतदारसंघात काका-पुतणे, मामा-भाचे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले पाहिले आहेत. पण राजस्थानमधील दोन मतदार संघात मात्र वेगळीच चकमक उडाली. दांता रामगड मतदारसंघात पतीविरोधात पत्नी निवडणुकीत उतरली. तर धौलपूर मतदारसंघात भावजीला मेव्हणीने आव्हान दिले होते. काँग्रेसविरुद्ध भाजप असा मुख्य सामना रंगलेला असताना या दोन मतदारसंघाकडे पण मतदारांचे लक्ष लागले होते. कोण-कोणाचा पराभव करतो, हा चर्चेचा विषय होता. यामध्ये पतीने पत्नीला पराभवाचे तोंड दाखवले तर मेव्हणीने भावजीला राजकारणात नवीन धडा शिकवला.

दांता रामगडमध्ये पतीने मारली बाजी

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार चौधरी वीरेंद्र सिंह यांची चांगली पकड आहे. दांता रामगड हा त्यांचा मतदारसंघ आहे. आतापर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारण्यात त्यांचा हातखंड होता. पण यावेळी त्यांच्यावर धर्मसंकट आले. त्यांची पत्नी रीता चौधरी यांनीच त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उभारला. घरातूनच चौधरी यांना विरोध झाला. त्यांची पत्नी रीता निवडणूक रिंगणात उभी ठाकली. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये बेबनाव सुरु आहे. दोन्ही वेगवेगळे राहत आहेत.हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या महिला विंगच्या रिता या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी याच पक्षाच्या तिकीटावर पतीविरोधात बंड केले. पण मुरब्बी पतीने डाव खेळला. पत्नी या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फेकल्या गेली. पतीचा वीरेंद्र सिंह चौधरी यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली.

क्रॉस वोटिंगचा करिष्मा

दुसरी फाईट पण टाईट झाली. हा सामना भावजी विरोधात मेव्हणी असा होता. शोभाराणी कुशवाह विरोधात डॉ. शिवचरण कुशवाह असा हा सामना होता. 2022 मध्ये क्रॉस वोटिंगमुळे भाजपने शोभाराणी यांना पक्षा बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजपने त्यांच्याविरोधात डॉ. शिवचरण कुशवाह यांना उतरवले. शोभाराणी या त्यांच्या मेव्हणी तर आहेतच पण वहिनी पण आहे. या निवडणुकीत दोघे आमने-सामने उभे ठाकले. शोभाराणी यांनी करिष्मा केला. त्यांना 69724 मतदान मिळाले. त्यांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रितेश शर्मा यांचा 16789 मतांनी पराभव केला. तर या लढाईत डॉ. शिवचरण यांना 45637 मतदान पडले. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.