AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 दिवसांत लग्न होतं, अचानक धमक्या येऊ लागल्या… तरुणाने स्वत:ला संपवलं, नेमकं प्रकरण तरी काय?

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना एका तरुणाला धमक्यांचे फोन येऊ लागले होते. शेवटी त्याने स्वत:ला संपवले. पण तरुणाला अशा कोणत्या धमक्या येत होत्या? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...

3 दिवसांत लग्न होतं, अचानक धमक्या येऊ लागल्या… तरुणाने स्वत:ला संपवलं, नेमकं प्रकरण तरी काय?
HydrabadImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Nov 21, 2025 | 3:42 PM
Share

एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लग्नाला फक्त तीन दिवस बाकी असताना एका तरुणाने आत्महत्या केली. त्याला सतत धमक्यांचे फोन येऊ लागले होते. तरुण या धमक्यांना कंटाळला होता. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने टोकाचे पाऊल उचलले. पण नेमकं तरुणाने काय केले होते? याचा तपास पोलीस घेताना दिसत आहेत. तसेच कुटुंबातील काही सदस्यांनी धक्कादायक खुलासा केला. आता नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ही घटना हैदराबादच्या वनस्थलीपुरममध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण परांडा श्रीकांत (वय 32) साहेबनगर येथे राहत होता. तो रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित काम करत होता. मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याने हैदराबादच्या हयातनगर परिसरातील चार व्यक्तींकडून सुमारे 2 लाख रुपये उसने घेतले होते. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने तो ही रक्कम वेळेवर परत करू शकला नव्हता.

23 नोव्हेंबरला लग्न ठरले होते

या दरम्यान, श्रीकांतचे लग्न 23 नोव्हेंबरला ठरले होते आणि घरी लग्नाच्या जोरदार तयारी सुरू होत्या. तरुणाने लग्नाची चांगली तयारी केली होती. तसेच त्याने होणाऱ्या बायकोला देखील सोन्याचे दागिणे, नव्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्या घेतल्या होत्या. आरोप आहे की कर्ज देणाऱ्या चौघांनी दबाव वाढवण्यासाठी श्रीकांतला सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. ते त्याला म्हणत असत की पैसे परत नाही केले तर त्याचे लग्न थांबवतील म्हणून. या धमक्यांमुळे श्रीकांत मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता.

कुटुंबीयांचा आरोप आहे की सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे श्रीकांतने आपले आयुष्य संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ नोट रेकॉर्ड केला, ज्यात त्याने त्या चार व्यक्तींची नावे स्पष्टपणे सांगितली सत्यनारायण, सुभ्बाराव, अप्पम शेखर आणि ऐतगोनी शेखर. व्हिडीओत त्याने विनंती केली की आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या लोकांना सोडू नये. हा व्हिडीओ त्याने आपल्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही पाठवला होता.

विष प्राशन करून जीव दिला

गुरुवारी २० नोव्हेंबरला सकाळी जेव्हा कुटुंबीयांना श्रीकांत दिसला नाही, तेव्हा त्यांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली आणि अखेर हरीहरपुरम चेरुवू कुट्टाजवळ श्रीकांत मृतावस्थेत आढळला. पोलिसांना कळवण्यात आले आणि ते घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समजले की त्याने कीटकनाशक विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतकाजवळ सापडलेल्या व्हिडीओ आणि सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी सांगितलेल्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की कर्जवसुलीच्या नावावर सतत धमक्या आणि लग्न थांबवण्याची धमकी हे श्रीकांतच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण ठरले आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.