महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह 45 बँकांसाठी मेगा भरती, अर्ज कसा कराल?

आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज करता येईल. देशभरातील विविध 45 बँकांची या भरती प्रक्रियेत समावेश आहे, ज्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकही असेल.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह 45 बँकांसाठी मेगा भरती, अर्ज कसा कराल?

IBPS RRB 2019 Apply Online : इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल म्हणजेच आयबीपीएसने ग्रामीण बँकांमध्ये विविध पदांसाठी नॉटिफिकेशन जारी केलंय. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज करता येईल. देशभरातील विविध 45 बँकांची या भरती प्रक्रियेत समावेश आहे, ज्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकही असेल.

या सर्व पदांसाठी वेगवेगळ्या लिंक देण्यात आल्या आहेत. सर्व पदांसाठी 18 जून ते 4 जुलै या काळात अर्ज करता येईल, तर 19 जुलै ही अर्जाची प्रिंट घेण्यासाठी शेवटची तारीख आहे. विशेष म्हणजे अर्जाचं ऑनलाईन पेमेंटही 4 जुलैपर्यंतच करावं लागेल. या पदांसाठी पूर्व आणि मुख्य कम्प्युटर आधारित परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.

आयबीपीएसच्या ऑफिशिअल कॅलेंडरनुसार, ऑफिस असिस्टंट आणि स्केल वन ऑफिसर या पदांसाठी पूर्व परीक्षेचं आयोजन 3, 4, 11, 17,18 आणि 25 ऑगस्टला केलं जाईल. तर ऑफिसर स्केल वनच्या मुख्य परीक्षेचं आयोजन 22 सप्टेंबर आणि असिस्टंट मुख्य परीक्षेचं आयोजन 29 सप्टेंबर रोजी केलं जाईल. या प्रक्रियेनुसार ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 साठी आयोजित केले जातील. अर्ज करण्यासाठी विनाआरक्षित प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गासाठी 100 रुपये फी आहे.

कोणाला अर्ज करता येईल?

अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं गरजेचं आहे. असिस्टंट पदासाठी पदवी आणि संबंधित बँकेची भाषा (उदाहरणार्थ महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी अर्ज करत असाल तर मराठीचं ज्ञान अनिवार्य) येणं गरजेचं आहे. शिवाय कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. 18 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतील.

ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 या पदांसाठीही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं गरजेचं आहे. शिवाय ठराविक विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिलं जाईल.

परीक्षेचा सिलॅबस, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि संबंधित माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *