निवडणूक प्रचारात महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केली तर आता खैर नाही, आयोग लगेच घेणार Action
राज्य निवडणूक आयोगाशिवाय महिला आयोगाने सर्वसामान्य महिलांना सुद्धा आवाहन केलं आहे. कुठल्याही पक्षाच्या पुरुष किंवा महिला उमेदवाराने कुठल्याही अन्य महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, तर राज्य महिला आयोगाला तात्काळ त्याची माहिती द्या.

निवडणुकीच्या प्रचार काळात अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली जातात. भाषणाच्या ओघात नेतेमंडळी खूप काही बोलून जाते. त्यावर नंतर वाद होतो. आता पुढच्या काही महिन्या बिहार विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. यावेळी सुद्धा काही वादग्रस्त वक्तव्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरुन महिलांच्या बाबती अशी वक्तव्य होऊ शकतात. म्हणून महिला आयोगाने वेळीच कंबर कसली आहे. कुठल्याही नेत्याने महिला उमेदवार किंवा महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केली तर राज्य महिला आयोग स्वत: दखल घेणार आहे. राज्य महिला आयोगाने या बद्दल निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आहे. पत्रातून निवडणूक आयोगाला याकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. याची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा आग्रह करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाशिवाय महिला आयोगाने सर्वसामान्य महिलांना सुद्धा आवाहन केलं आहे. कुठल्याही पक्षाच्या पुरुष किंवा महिला उमेदवाराने कुठल्याही अन्य महिला उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले, तर राज्य महिला आयोगाला तात्काळ त्याची माहिती द्या. यासाठी महिला आयोगाच्या वेबसाइटवर आयोगाच्या अध्यक्षा आणि सदस्यांचे मोबाइल नंबर देण्यात आले आहेत.
त्यात त्यांच्या अडचणी समजून घेईल
राज्य महिला आयोग ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही मोहिम सुरु करणार आहे. यामध्ये आयोगाची टीम प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनीशी बोलेल. त्यात त्यांच्या अडचणी समजून घेईल. यावेळी सुद्धा विद्यार्थिनी महिला उमेदवार किंवा महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीची माहिती आयोगाला देऊ शकतात.
राज्य महिला आयोगाने काय निर्देश दिलेत?
महिला उमेदवाराच्या जीवनावर कुठलीही टीका नाही झाली पाहिजे.
धर्म, समुदाय आणि जातीवरुन टिप्पणी नको.
महिला उमेदवाराच कुटुंब किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांवर व्यक्तिगत टीका किंवा चुकीच्या शब्दांचा वापर नको.
महिला उमेदवाराच काम आणि त्यांच्या शिक्षणावर टिप्पणी करु नये.
निवडणूक काळात कुठल्याही महिलेबद्दल अभद्र भाषा वापरणाऱ्यांची दखल घेतली जाईल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष अप्सरा यांनी सांगितलं. प्रत्येक राजकीय पक्षाने याची काळजी घ्यावी.
