नवी दिल्ली: भारतीय महिलांच्या यशाच्या पेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे. एअर इंडियाच्या महिला पायलटांच्या टीमने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून बेंगळुरूसाठी उड्डाण केले. पण हे साधेसुधे उड्डाण नव्हते. पहिल्यांदाच महिला वैमानिकांनी उत्तर ध्रुवावरून (North Pole) उड्डाण करून इतिहास घडवला आहे. एअर इंडियाच्या पायलट जोया अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली असून संपूर्ण जगभरातून या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (In a first, all-women Air India crew fly from San Francisco to Bengaluru)
एअर इंडियांच्या महिला वैमानिकांनी जगातील सर्वात लांब हवाई मार्ग असलेल्या उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेऊन इतिहास रचला. या विमानाने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून उड्डाण घेतले. त्यानंतर ही टीम उत्तर ध्रुवावरून बंगळुरूला पोहोचली. या दरम्यान, महिला वैमानिकांच्या टीमने 16,000 किलोमीटरचा पल्ला पार पाडला. या ऐतिहासिक उड्डाणाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. एअर इंडियाने स्वत: ट्विटरवरून या ऐतिहासिक उड्डाणाची माहिती दिली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनीही याबाबत ट्विट करून महिला वैमानिकांचे अभिनंदन केले आहे.
सध्या उत्तर ध्रुवाववरून ही टीम गुजरातला पोहोचली आहे. हे विमान उत्तर ध्रुवावरून अटलांटिक मार्गे बंगळुरू एअर पोर्टला दाखल झालं. कॅप्टन जोया अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली. को-पायलट म्हणून जोया यांच्यासोबत कॅप्टन पापागरी तनमई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे होत्या. या ऐतिहासिक कामगिरीनंतर एअर इंडियाने ट्विट केलं आहे. वेलकम होम, आम्हाला तुमच्या सर्वांचा अभिमान आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या AI176 पॅसेंजरचे आम्ही अभिनंदन करतो, असं ट्विट एअर इंडियाने केलं आहे.
भारत की बेटियां
या पूर्वीही उत्तर ध्रुवावरून उड्डाण करण्यात आलेलं आहे. पण संपूर्ण महिला टीमने केलेली ही पहिलीच कामगिरी आहे. भारताच्या मुलींनी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपर्यंतची ऐतिहासिक उड्डाण घेतील, असं जोया अग्रवाल यांनी सांगितलं.
वंदे भारत मिशनला महत्त्व आलं
सॅन फ्रान्सिस्कोवरून बंगळुरूपर्यंत महिला वैमानिकांनी ऐतिहासिक उड्डाण घेतलं आहे. त्यामुळे वंदे भारत मिशनला आणखी महत्त्व आलं आहे. या मिशनद्वारे आतापर्यंत 46.5 लाखाहून अधिक लोकांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यात आली आहे, असं नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी म्हटलं आहे. (In a first, all-women Air India crew fly from San Francisco to Bengaluru)
#FlyAI : Welcome Home Capt Zoya Agarwal, Capt Papagiri Thanmei, Capt Akanksha & Capt Shivani after completing a landmark journey with touchdown @BLRAirport.
Kudos for making Air India proud.
We also congratulate passengers of AI176 for being part of this historic moment. pic.twitter.com/UFUjvvG01h
— Air India (@airindiain) January 10, 2021
संबंधित बातम्या:
बक्षिसाचे 20 लाख हडप करण्यासाठी कट, जम्मू-काश्मीरमधील बनावट चकमकप्रकरणी मोठा खुलासा
‘देश आई, तर शेतकरी बाप आहे’, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कलाकारही एकवटले
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण, केंद्र सरकारची मोठी घोषणा
(In a first, all-women Air India crew fly from San Francisco to Bengaluru)