Delhi Crime : महिलेचे शीर व हातपाय तोडून धड रस्त्यावर फेकले, दिल्लीमध्ये क्रूरतेचा कळस

Delhi Crime : महिलेचे शीर व हातपाय तोडून धड रस्त्यावर फेकले, दिल्लीमध्ये क्रूरतेचा कळस
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक 543 जवळ एका बॉक्समध्ये धड पडले होते. महिलेने काळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा परिधान केला होता. तर टी-शर्ट शेजारी पडलेल्या बॅगेत होता, अशी माहिती नॉलेज पार्क पोलिसांनी दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 18, 2022 | 12:53 AM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे आहे. ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेकर्‍यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. महिलेचे डोके आणि हात-पाय तोडून धड प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून सेक्टर 146 मधील मेट्रो स्टेशनजवळ रस्त्यावर शुक्रवारी रात्री फेकून देण्यात आला. पोलिसांना मृतदेहाच्या शेजारी एक बॅग सापडली असून या बॅगेत महिलेचे कपडे आढळले आहेत. मात्र अद्याप या महिलेची ओळख पटू शकली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की महिलेची हत्या दुसऱ्या ठिकाणी करण्यात असून विल्हेवाट या परिसरात लावली.

महिलेची अद्याप ओळख पटली नाही

हातरस येथील ललित कुमार नामक रहिवाशाने शुक्रवारी रात्री मेट्रो स्टेशनजवळ महिलेचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक 543 जवळ एका बॉक्समध्ये धड पडले होते. महिलेने काळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा परिधान केला होता. तर टी-शर्ट शेजारी पडलेल्या बॅगेत होता, अशी माहिती नॉलेज पार्क पोलिसांनी दिली. पोलिसांनी महिलेचे डोके आणि हात पाय शोधले. मात्र सापडले नाहीत. तसेच महिलेची ओळख पटेल असे कोणतीही वस्तू पोलिसांना सापडली नाही. हे कृत्य खाटिकचे काम करणाऱ्या इसमाने केले असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास लावलेले जवळपास 15 सीसीटीव्ही तपासले आहेत. या दरम्यान या रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांचे नंबर पोलिसांनी नोट करुन तपास सुरु केला आहे. शवविच्छेदन अहवालात गंभीर मारहाण करीत महिलेची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी महिलेच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच महिलेची ओळख पटवून आरोपीला अटक केल्यानंतरच घटनेचा उलगडा होईल, असे ग्रेटर नोएडा झोनचे डीसीपी अमित कुमार यांनी सांगितले. (In Delhi, a woman’s head and limbs were broken and her body was thrown on the road)

इतर बातम्या

Pimpari-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 21 वर्षांचा नराधम गजाआड

Satara : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें