AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : जिंद महापंचायतीचं व्यासपीठ कोसळलं, काहीजण जखमी, ‘व्यासपीठ तर भाग्यवानांचे कोसळतात,’ टिकैत यांची कोटी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले.

Video : जिंद महापंचायतीचं व्यासपीठ कोसळलं, काहीजण जखमी, 'व्यासपीठ तर भाग्यवानांचे कोसळतात,' टिकैत यांची कोटी
| Updated on: Feb 03, 2021 | 3:16 PM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील जिंदमध्ये महापंचायत सुरु होती. त्यावेळी शेतकरी आंदोलक आणि नेते महेंद्रसिंह टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळले. त्यावेळी राकेश टिकैत यांनी परिस्थिती सावरत व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे तुटतात, अशी कोटी केली. हरियाणाच्या जिंदमध्ये कंडेला इथं शेतकऱ्यांची महापंचायत सुरु आहे. या महापंचायतीला संबोधित करण्यासाठी महेंद्रसिह टिकैत उपस्थित झाले आहेत. या ठिकाणी 50 खाप पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाली आहे. त्याच दरम्यान टिकैत उपस्थित असलेल्या व्यासपीठाचे दोन भाग कोसळल्याची घटना घडली आहे.(In Jind, the platform where farmer leader Mahendra Singh Tikait was present collapsed)

टिकैत त्यांच्या भाषणासाठी मोठी गर्दी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 70 वा दिवस आहे. दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकरी अजूनही तळ ठोकून आहेत. दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत आज हरियाणातील जिंद इथं महापंचायतीला संबोधित करण्यासाठी पोहोचले आहेत. टिकैत यांचं भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी टिकैत यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच ते उभे असलेलं व्यासपीठ कोसळलं. त्यावेळी एकच गोंधळ उडाल्याची चित्र पहायला मिळालं. पण टिकैत यांनी परिस्थितीचं भान ओळखून व्यासपीठ तर भाग्यवान लोकांचे कोसळतात अशी कोटी केली. त्यामुळे वातावरण हलकं होण्यास मदत झाली.

दिल्लीच्या सीमांवर कुठे खिळे तर कुठे भिंती!

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवया रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले असून अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत. या शिवाय जमावाने दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमेभोवती एक प्रकारची तटबंदीच करण्यात आली आहे. त्यावरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या : 

दीप सिद्धूसह इतर फरार आरोपींवर प्रत्येकी 1 लाखांचं बक्षीस; तपासासाठी एसआयटी

Kunal Kamra | ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट, संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामराचं भाष्य

In Jind, the platform where farmer leader Mahendra Singh Tikait was present collapsed

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.