Kunal Kamra | ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट, संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामराचं भाष्य

कामराने राऊतांची 'शट अप या कुणाल' या कार्यक्रमात मुलाखत घेत बुलडोझर भेट दिला होता (Kunal Kamra Sanjay Raut Rakesh Tikait)

Kunal Kamra | ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट, संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामराचं भाष्य

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राऊत-टिकैत भेटीवर मिश्किल भाष्य केलं. ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट करत कामराने ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ असं लिहिलं आहे. (Kunal Kamra tweet on Sanjay Raut meeting Rakesh Tikait at Gazipur Border)

मुंबई, मुंबई पोलीस यांच्यावर भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे संजय राऊत यांच्याशी  ट्विटरवर घमासान झाले होते. त्यानंतर कंगनाच्या वांद्र्यातील अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा मारला. त्यानंतर कामराने राऊतांची ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात मुलाखत घेतली होती. यावेळी बुलडोझर भेट दिला होता. त्यामुळे राऊत-टिकैत भेटीला बुलडोझर-ट्रॅक्टरची उपमा त्याने दिली.

“लोकशाही जिवंत आहे का?”

संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू हे मृत्यू नसून हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला.

कुणाल कामराचं ट्विट :

शिवसेनेच्या शिष्टमंडळाची शेतकऱ्यांशी भेट

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला हवा देण्यासाठीच शिवसेना खासदार शेतकऱ्यांना भेटल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. (Kunal Kamra Sanjay Raut Rakesh Tikait)

टिकैत यांना अश्रू अनावर

शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.

‘संजय राऊत, कोरोना नाही’

या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. राऊत आणि त्यांचे सहकारी तोंडाला मास्क लावून आंदोलनस्थळी आले. यावेळी महिलांनी एकच गोंधळ घातला. संजय राऊत कोरोना नाही. तोंडाचे मास्क काढा. या सरकारला तुम्हीही बहकला का?, असा सवाल या महिला करत होत्या.

संबंधित बातम्या :

टिकैत यांना राऊत म्हणाले, तुमचे अश्रू बघून राहावलं नाही !

या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा

(Kunal Kamra tweet on Sanjay Raut meeting Rakesh Tikait at Gazipur Border)

Published On - 7:42 am, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI