या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. (sanjay raut meets protesting farmers in ghazipur border at delhi)

या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 1:32 PM

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा पाहून या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा संताप व्यक्त केला. आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांचे जे मृत्यू झाले. ते शेतकऱ्यांचे मृत्यू नसून या शेतकऱ्यांच्या हत्याच आहेत, असा घणाघाती आरोपही शिवसेनेने केला आहे. (sanjay raut meets protesting farmers in ghazipur border at delhi)

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा खासदारांनी आज गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शिवसेना खासदारांनी पहिल्यांदाच शेतकऱ्यांची भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला हवा देण्यासाठीच शिवसेना खासदार शेतकऱ्यांना भेटल्याची या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

टिकैत यांना अश्रू अनावर

शिवसेनेचं शिष्टमंडळ आंदोलन स्थळी येताच शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकैत यांना अश्रू अनावर झाले. राऊत आणि शिष्टमंडळाने टिकैत यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं आश्वासनही आंदोलकांना दिलं.

‘संजय राऊत, कोरोना नाही’

या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. राऊत आणि त्यांचे सहकारी तोंडाला मास्क लावून आंदोलनस्थळी आले. यावेळी महिलांनी एकच गोंधळ घातला. संजय राऊत कोरोना नाही. तोंडाचे मास्क काढा. या सरकारला तुम्हीही बहकला का?, असा सवाल या महिला करत होत्या.

अहंकाराने देश चालत नाही: राऊत

यावेळी राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही. राजकारणही चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

शेतकऱ्यांचा हत्याच: सावंत

गेल्या 70 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हा शेतकऱ्यांचा मृत्यू नसून त्या हत्याच आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला. गाझी बॉर्डरवर येण्यासाठी उलट्यासुलट्या मार्गाने आम्हाला यावं लागलं. आम्हाला एक तास लागला. आम्ही कसं आलो हे आम्हालाच माहीत नाही. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ठिकठिकाणी भिंती उभारल्या आहेत. जाळ्या लावल्या आहेत. एवढा बंदोबस्त कशासाठी? एवढंच वाटतं तर पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर बंदोबस्त ठेवा. या देशात लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल सावंत यांनी केला. (sanjay raut meets protesting farmers in ghazipur border at delhi)

आपल्याच देशात आहोत का?: देसाई

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. गाझीपूर बॉर्डवरवरील चित्रं दुर्देवी आणि मनाला चटका लावणारं आहे. शेतकरी बाहेर पडू नयेत म्हणून तारांची कुंपणं घातली आहेत. हा देश नेमका कुठल्या दिशेने चालला आहे हे यातून दिसून येतंय, असं सांगतानाच आपण आपल्याच देशात आहोत का? असा सवाल अनिल देसाई यांनी केला. (sanjay raut meets protesting farmers in ghazipur border at delhi)

संबंधित बातम्या:

सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर, राजू शेट्टींच्या ‘टायमिंग’ने भेट टळली!

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

कल्याण डोंबिवलीत मनसेचे दोन शिलेदार पक्षाबाहेर, आमदार राजू पाटील घडी कशी सावरणार?

(sanjay raut meets protesting farmers in ghazipur border at delhi)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.