कल्याण डोंबिवलीत मनसेचे दोन शिलेदार पक्षाबाहेर, आमदार राजू पाटील घडी कशी सावरणार?

मनसेला खिंडार पडल्याने येणाऱ्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. (MNS Raju Patil Kalyan Dombivali)

कल्याण डोंबिवलीत मनसेचे दोन शिलेदार पक्षाबाहेर, आमदार राजू पाटील घडी कशी सावरणार?
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 12:59 PM

कल्याण डोंबिवली : मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे (Mandar Halbe) यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. सलग दोन दिवस मनसेला एकामागून एक धक्के बसले आहेत. ऐन कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) आता पक्षाला कसे सावरणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (How MNS MLA Raju Patil revive party in Kalyan Dombivali)

मनसेच्या एकमेव आमदारासमोर आव्हानाचा डोंगर

गेल्या 10 वर्षांपासून मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत सक्रिय विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे. शिवसेना-भाजप युती तुटण्याआधी महापालिकेचे विरोधी पक्षपद मनसेकडे होतं. 2010 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आले होते, तर 2015 मध्ये 9 नगरसेवकच विजयी झाले. 2019 च्या विधानसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे डोंबिवलीतून निवडून आले. त्यानंतर मनसेची ताकद वाढणार असे बोलले जात होते. मात्र मनसेला खिंडार पडल्याने येणाऱ्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.

मनसेची भूमिका मांडणारा वक्ता पक्षाबाहेर

गेल्या 10 वर्षांपासून मंदार हळबे डोंबिवली येथील राजाजी पथ या भागातून नगरसेवक होते. विरोधी पक्षनेते, गटनेते पदही त्यांच्याकडे होते. 2019 मध्ये मनसेने त्यांना डोंबिवलीतून विधानसभेची उमेदवारी दिली होती. एक चांगला वक्ता आणि चांगल्या पद्धतीने पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्ती मनसेतून बाहेर गेली आहे. त्यामुळे मनसेला चांगलाच फटका बसणार आहे.

राजू पाटलांची राज ठाकरेंशी चर्चा

दरम्यान, आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजवर धाव घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी जवळपास 35 मिनिटं चर्चा केली. राजेश कदम आणि मंदार हळबेंच्या पक्षांतरानंतर मनसेला डोंबिवलीत पडलेल्या खिंडारामुळे कृष्णकुंजवर व्यूहरचनेला सुरुवात झाली. मार्च महिन्यात केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.

कोण आहेत मंदार हळबे?

मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते (How MNS MLA Raju Patil revive party in Kalyan Dombivali)

केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं

मंदार हळबे दहा वर्षांपासून कल्याणचे नगरसेवक

पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही

लहानपणापासून भाजपसाठी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रेरित झालो. देवेंद्र फडणवीस यांचे कामही प्रभावी आहे. राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपप्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना सांगितलं. दहा वर्ष ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असं हळबेंनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

मनसेला 24 तासात दुसरा झटका, आधी राजेश कदम शिवसेनेत, आता बडा नेता भाजपमध्ये

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

(How MNS MLA Raju Patil revive party in Kalyan Dombivali)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.