AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीप सिद्धूसह इतर फरार आरोपींवर प्रत्येकी 1 लाखांचं बक्षीस; तपासासाठी एसआयटी

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर वेगळाच ध्वज फडकविल्याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू, जुगराज सिंगसह इतर दोन आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. (Delhi Police Announce 1 Lakh Reward For Arrest Of Deep Sidhu And Others)

दीप सिद्धूसह इतर फरार आरोपींवर प्रत्येकी 1 लाखांचं बक्षीस; तपासासाठी एसआयटी
दीप सिद्धू
| Edited By: | Updated on: Feb 09, 2021 | 11:21 AM
Share

नवी दिल्ली: दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर वेगळाच ध्वज फडकविल्याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu), जुगराज सिंगसह इतर दोन आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली असून सर्व आरोपींवर प्रत्येकी एक-एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. त्याशिवाय इतर काही आरोपींवर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. (Delhi Police Announce 1 Lakh Reward For Arrest Of Deep Sidhu And Others)

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवण्यात आला होत. दीप सिद्धू यानेच हा झेंडा फडकवल्याचं बोललं जात होतं. सध्या दीप सिद्धू फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तो बिहारमध्ये लपला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बिहारमध्येही त्याचा शोध घेतला जात आहे. दीप सिद्धू हा पंजाबी कलाकार असून भाजपशी त्याचे निकटचे संबंध असल्याचं बोललं जात आहे.

कुणावर किती बक्षीस?

दीप सिद्धू, जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांना शोधून दिल्यास किंवा त्यांची माहिती दिल्यास प्रत्येकी एक-एक लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तर जजबीर सिंग, बुटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. या सर्वांवर झेंडा फडकवल्याचा आणि हिंसा भडकावल्याचा आरोप आहे.

हिंसेच्या चौकशीसाठी एसआयटी

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ज्वॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करणार आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात जॉय टिर्की, भीष्म सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेत 394 पोलीस जखमी झाले होते. त्यात पोलिसांच्या 30 गाड्यांचे नुकसान झालं होतं. दिल्ली पोलिसांनी या हिंसेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना प्रत्येकी 25-25 हजार रुपयांची आर्थिक मदत तर इतर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. (Delhi Police Announce 1 Lakh Reward For Arrest Of Deep Sidhu And Others)

संबंधित बातम्या:

मोदी सरकारला शेतकऱ्यांसोबत युद्ध करायचे आहे का?; राष्ट्रवादीचा संतप्त सवाल

धरणे आंदोलनात गुन्हा केल्यास सरकारी नोकरी नाही; बिहार पोलिसांचे फर्मान

Kunal Kamra | ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट, संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामराचं भाष्य

मुख्यमंत्रीजी, तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, आपच्या खासदाराचा सवाल

(Delhi Police Announce 1 Lakh Reward For Arrest Of Deep Sidhu And Others)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...