AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळमध्ये राष्ट्रवादी वेगळ्या भूमिकेच्या तयारीत? पक्षाच्या राज्य अधिवेशनात काय ठरलं?

राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या राज्य अधिवेशन केरळातील एर्नाकुलम येथे आज झाले. याआधी ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कासरगोड ते तिरुवनंतपुरमपर्यंत जनसंवाद दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पक्षाच्या कार्यप्रणालीबाबत जनजागृती करण्यात आली.

केरळमध्ये राष्ट्रवादी वेगळ्या भूमिकेच्या तयारीत? पक्षाच्या राज्य अधिवेशनात काय ठरलं?
ncp state convention in kerala cochhi Ernakulam
| Updated on: Feb 22, 2025 | 7:21 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन केरळ राज्यातील कोच्ची येथे घेण्यात आले. या अधिवेशनाला अनेक महत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती लाभली होती. केरळातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह केरळ राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या तयारीचा आढावा या अधिवेशनात घेण्यात आला. पक्षाची भविष्यातील धोरणे यावेळी निश्चित करण्यात आली. सध्या तरी राष्ट्रवादीचे कोणत्याही अन्य पक्षाशी युती नसली तरी भविष्यात कोणाशी युती करायची नाही याचा निर्णय केरळ राज्यातील नेते स्थानिक पातळीवर निर्णय घेतील असे यावेळी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य अधिवेशन केरळच्या कोच्ची येथील एर्नाकुलम येथील राजेंद्र मैदानात शनिवारी संपन्न झाले. या अधिवेशनात पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यातील राजकीय परिस्थिती, पक्षाच्या भविष्यातील दिशा आणि महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव तसेच राज्याचे अध्यक्ष एन.ए. मोहम्मद कुट्टी उपस्थित होते.

परिस्थितीनुसार पार्टीची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीए आघाडीचा भाग आहे तर नागालँडमध्ये पार्टीचे नऊ आमदार आहेत. अरुणाचल प्रदेशातही आमदार आहेत. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुमारे ३० जागांवर भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये परिस्थितीनुसार पार्टीची भूमिका असते असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले.

राज्य अधिवेशनाला नवी ऊर्जा

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच विशिष्ट मूल्ये जपली आहेत आणि ती कायम राहतील. सध्या पक्ष कोणत्याही आघाडीचा भाग नसून स्वतंत्र भूमिका घेत आहे. भविष्यात अन्य कोणत्या आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाईल. असे पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले. सध्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष मजबूत करणे आहे. राज्याचे अध्यक्ष पी. सी. चाको यांच्या नेतृत्वाखाली या राज्य अधिवेशनाला नवी ऊर्जा देईल, असेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.