हायब्रिड वारफेअरच्या मुद्द्यावर मोदींची चिंता; चीनकडून असलेल्या धोक्याबाबत जवानांना केले सतर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या कारवायांवरून भारतीय जवानांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीन सध्या हायब्रिड वारफेअरच्या तयारीत असून आपल्याला सतर्क राहावे लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हायब्रिड वारफेअरच्या मुद्द्यावर मोदींची चिंता; चीनकडून असलेल्या धोक्याबाबत जवानांना केले सतर्क
narendra modi
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 6:55 PM

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या कारवायांवरून भारतीय जवानांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीन सध्या हायब्रिड वारफेअरच्या तयारीत असून आपल्याला सतर्क राहावे लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या नवे तंत्रज्ञान विकसीत होत असून यूद्धाचे स्वरूप देखील बदलत आहे. त्यामुळे आपल्याला परिस्थिती लक्षात घेऊन तसे बदल करावे लागतील, त्यासाठी नवे यूद्ध कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी जवानांसोबत बोलताना त्यांनी चीनच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त कली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ‘एलएसी’ परिसरामध्ये चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने या भागात जवळपास 1957 किलोमीटर लांबीच्या फायबर ऑप्टिकलचे जाळे निर्माण केले आहे. या फायबर ऑप्टिकलच्या जाळ्यांमुळे चीनला सीमावर्ती भागात माहितीचे आदानप्रदान करणे सोपे होणार आहे. माहितीची देवाण -घेवाण वेगवान झाल्याने या भागात आवश्यकतेनुसार सैनिकांची नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच त्यांना अत्यावश्यक सेवेचा पुरवठा देखील तातडीने करणे शक्य होणार आहे.

चीनकडून अमेरिकेच्या यूद्ध कौशल्याचा अभ्यास 

एवढेच नव्हे तर हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, चीन सध्या अमेरिकन युद्ध कौशल्याचा अभ्यास करत असून त्यांनी अमेरिकन युद्ध कौशल्यावर एक 438 पानाचा रिपोर्ट देखील बनवला आहे. या रिपोर्टमध्ये अमेरिकेच्या यूद्धनितीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे युद्ध तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून 1993 साली खाडी यूद्धादरम्यान अमेरिकेने जेव्हा टार्गेटवर हल्ला केला तेव्हा त्यांना त्यासाठी 100 मिनिटांचा वेळ लागला होता. मात्र जेव्हा त्यांनी 2003 साली इराकसोबत यूद्ध केले तेव्हा त्यांनी शत्रूंवर हल्ला करण्याचा वेग कमी करून अवघ्या दहा मिनिटांवर आणल्याचे देखील या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. चीन आपल्या प्रत्येक सीमावर्ती भागात फायबर ऑप्टिकलचे जाळे निर्माण करत असून ते त्यांच्या मुख्य शहरातील कार्यालयाशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे माहितीचे आदान प्रदान अधिक गतीमान होऊन, सैनिकांना तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल.

भारत -अमेरिका संबंध बिघडवण्याचा प्रयत्न 

भारत-चीन संबंधांवर पेंटागनकडून नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार चीन सातत्याने भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये सध्या सीमावाद सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आणि भारताचे संबंध अधिक चांगले व्हावेत असे चीनला वाटत नसल्याचे पेंटागनने म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Narendra Modi at Kedarnath | पंतप्रधान मोदी केदारनाथाच्या चरणी लीन…..

ईश्वराच्या कृपेनेच केदारनाथचा विकास, नरेंद्र मोदींनी सांगितला ‘शंकर’ शब्दाचा अर्थ

मोदींच्या हस्ते आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण; शंकराचार्यांनी केला होता केदारनाथ मंदिराचा जिर्नोद्धार

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.