AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नापासून दूर नाही, TV9 नेटवर्कचे सीईओ दास यांचा विश्वास

ग्लोबल समिटमध्ये 75 दिग्गज त्यांचे विचार आणि अनुभव मांडणार आहेत.

What India Thinks Today : भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नापासून दूर नाही, TV9 नेटवर्कचे सीईओ दास यांचा विश्वास
दिग्गजांच्या विचारांची पर्वणी
| Updated on: Jun 17, 2022 | 2:14 PM
Share

नवी दिल्ली : व्हॉट इंडिया थिंक्स टुडे‘या (What India Thinks Today) ग्लोबर समिटचं राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आयोजन करण्यात आलं आहेत. या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये अर्थशास्त्र, आरोग्य, राजकारण, प्रशासन, क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या ग्लोबल समिटमध्ये 75 दिग्गज त्यांचे विचार आणि अनुभव मांडणार आहेत. आज या ग्लोबल समिटच्या (Global Summit) कार्यक्रमाचा दिग्गजांच्या उपस्थितीत tv9चे सीईओ बरुन दास यांनी शुभारंभ केला. बरुन दास यांनी सांगितलं की भारत कसा जागतिक गुरू होण्याच्या जवळ आहे. पण, दूर नाही. दास म्हणाले की, भारत आरोग्य क्षेत्रापासून परराष्ट्र धोरणात सातत्यानं पुढे जात असून जागतिक भारताची विशेष ओळख होत आहे.

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’या ग्लोबर समिट

दास यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत tv9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सीईओ दास म्हणाले की, ‘tv9 ग्रुप इंडियाचे नंबर वन न्यूज नेटवर्क बनवल्याबद्दल tv9 ग्रुपचे आभार माणून ग्लोबल समिट पाहणाऱ्या तुमच्या सर्वांचे आणि आमच्या लाखो दर्शकांचे मी आभार मानतो. येत्या दोन दिवसांत आम्ही धोरणं, प्रशासन, रणनीती तसेच अनेक प्रकारच्या आव्हानांवर 75 वक्त्यांची मते आणि अनुभव ऐकणार आहोत. यादरम्यान, अनेक कॅबिनेट मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योजक आणि पत्रकार यांच्या व्यतिरिक्त आमच्यासोबत दोन माजी जागतिक नेते डेव्हिड कॅमेरुन हमीद करझाई देखील असतील. या जागतिक शिखर परिषदेची आमची थीम ‘विश्व गुरु: हाऊ नियर हाऊ फार?’

दास पुढे म्हणाले की, ‘आज मी भारताला एका नव्या वळणावर पाहत आहे. एकीकडे आपण खऱ्या नेत्याप्रमाणे काम करून स्वप्न बघू लागलो आहोत. दुसरीकडे आम्ही पाश्चात्य नेतृत्वामध्ये काही अपूर्णता पाहत आहोत. ज्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकलं नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की, या युद्धाचे परिणाम युद्धापेक्षा देखील जास्त काळ टिकतील. त्यावेळी जगाला महागाई आणि पुरवठा साखळी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्याचा परिणाम जगभरातील प्रत्येक व्यक्तीवर होईल. जगात होत असलेले हे दोन समांतर बदल पाहता मला बंगाली कवी अतुल प्रसाद सेन यांच्या काही ओळी आठवतात. ‘भारत पुन्हा एकदा जगाच्या शिखरावर पोहोचेल. विश्वगुरू होण्याचे स्वप्न खूप जवळ आहे. दूर नाही,’

‘स्वातंत्र्यानंतर चार युद्धे लढूनही भारतानं कधीही युद्ध सुरू केले नाही. अनेक शत्रू शेजारी देश असूनही, आधुनिक काळात जागतिक स्तरावर भारताचा उदय शांततापूर्ण होता. एक देश म्हणून आपण नेहमीचेच प्रतिक आहोत. अलीकडील अनेक बदलांपैकी सर्वात भयंकर म्हणजे आपण आवश्यकतेनुसार बदलण्याचं ठरवलं आहे. आधी सर्जिकल स्ट्राईक झाला. त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राइकने पाकिस्तानची अण्वस्त्रे संपवली. गलवानमध्ये भारतानं दाखवून दिलं आहे की जेव्हा राष्ट्रीय हिताचा विचार केला जातो तेव्हा आकार काही पडत नाही.

शांतता आणि महासत्ता

त्याचबरोबर भारताच्या शांतता आणि महासत्ता होण्याबाबत दास म्हणाले की, शांततेनं भारत महासत्ता होणार आहे. जर असा प्रश्न नसून कधी हा प्रश्न आहे. मला खात्री आहे की आम्ही जवळ आहोत. दूर नाही. अलीकडे एक नेता बनवण्याचा आमचा हेतू समोर यावा जेव्हा आम्ही केवळ आमच्यासाठीच नाही तर जगासाठीही मोठ्या प्रमाणावर कोरोना लसींचं उत्पादन केलं. अशा परिस्थितीत भारताची फार्मसी बनवण्याचे वास्तव जवळ आहे, दूर नाही,’

यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल पुढे बोलताना दास म्हणाले की, सर्व मर्यादा ओलांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येण्यासाठी आणि भारताचे नाव अभिमानानं घेण्यासाठी प्रोत्साहित केलं नाही तर पूर्वीपेक्षा नक्कीच अधिक ब्रँड इंडिया बनवलं आहे. आज भारत स्वावलंबी भारताच्या पायावर उभा आहे. भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. टॉप-5मध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहे. महामारीमुळे विकासाची मर्यादा ओलांडणारी आपण एकमेव अर्थव्यवस्था आहे. आमचे स्वप्न 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे आहे. मला विश्वास आहे की आम्ही जवळ आहोत, दूर नाही,’

त्याचवेळी पायाभूत सुविधांच्या विकासाकडे पाहिले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या बदलांमुळे देशाच्या अंतर्गत भागांना औद्योगितक केंद्रांशी जोडले गेले आहे. या वर्षी त्यांनी रस्त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी 200 अब्ज डॉलरहून अधिक तरतूर केली आहे. 2024 पर्यंत 22 हरित द्रुतगती मार्ग बांधण्याचे वचन आहे. भारतातील पायाभूत सुविधांची तुलना अमेरिकेशी होईल, भू-राजकीय वातावरणाचा विचार केला तर अशी असंख्य उदाहरणं आपल्याला आत्मविश्वास देतात की भारत जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्यास तयार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडली तेव्हा मध्यपूर्वेकडील देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेचं नेतृत्व करण्यास भारतानं पुढाकार घेतला होता,’

युरोपची समस्या ही जगाची समस्या नाही-दास

जागतिक स्तरावर भारताच्या भूमिकेबाबत दास म्हणाले की, युक्रेन संकटाच्या काळातही अनेक जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन जाणून घेण्यासाठी भारताकडे वळले होते. पण, भारत धाडसी धोरणावर ठाम राहिले. आमचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मोठ्या अभिमानानं म्हणाले ज्याशी मी सहमत आहे, ‘आपल्या जमिनीवर उभे राहणे म्हणजे कुंपणावर बसण्यासारखे नाही.’आमची भूमिका स्पष्ट होती. मी पुन्हा एकदा म्हणतो, ‘युरोपची समस्या ही जगाची समस्या नाही’

आपल्या भाषणाच्या शेवटी दास म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक मोठी झेप घेत आहे. आपल्या सर्वांनी जबाबदारीनं वागण्याची वेळ आहे. एक देश म्हणून आपण सर्वांनी याचा फायदा घ्यायला हवा. आमचे ध्येय जवळ आहे, दूर नाही,असं शेवटी दास म्हणालेत.

मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.