AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताचा मास्टरस्ट्रोक अमेरिकेच्या टॅरिफवर भारी पडला, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, व्हाईट हाऊसची पहिल्यांदाच जाहीर कबुली

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे. टॅरिफ अस्त्र ट्रम्प यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! भारताचा मास्टरस्ट्रोक अमेरिकेच्या टॅरिफवर भारी पडला, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, व्हाईट हाऊसची पहिल्यांदाच जाहीर कबुली
| Updated on: Aug 18, 2025 | 5:10 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात मोठी घोषणा केली, त्यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून काही दिवसांमध्येच दुसरा मोठा धक्का भारताला दिला, त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. येत्या 28 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांचं हे टॅरिफ अस्त्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावताना भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, असं म्हटलं होतं. मात्र भारतानं ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे.  यावर स्पष्टीकरण देताना भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, भारताला रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे. अमेरिका आणि युरोपीयन युनियन देखील रशियाकडून वस्तुंची खरेदी करते.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता चीन, भारत आणि रशिया यांची जवळीक वाढत आहे. चीनने अमेरिकेला भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफवरून चांगलंच सुनावलं होतं. तर दुसरीकडे रशियानं देखील भारताचं समर्थन केलं आहे. रशिया, चीन आणि भारत यांची जवळीक वाढत असल्यामुळे व्हाईट हाऊसचं टेन्शन वाढलं आहे. याबाबत पहिल्यांदाच व्हाईट हाऊसकडून कबुली देण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू मानले जाणारे आणि व्हाइट हाउसचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो यांनी रशिया, भारत आणि चीनच्या वाढत्या जवळकीवरून चांगलाच जळफळाट व्यक्त केला आहे. त्यांनी भारताला धमकी दिली आहे, जर भारताला अमेरिकेसोबत आर्थिक संबंध मजबूत करायचे असतील तर त्यांनी असं करू नये, असं पीटर नवारो यांनी म्हटलं आहे, ते फायनाल्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

मात्र दुसरीकडे आता भारतानं देखील अमेरिकेवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेनं दाललेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीन जवळ येताना दिसत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाकडून देखील भारताला समर्थन मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेवर दबाव निर्माण झाला आहे.

Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट