AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या A टू Z माहिती

भारत आणि पाकिस्तान यांनी अलीकडेच शस्त्रसंधीचा करार केला आहे. या कराराचा अर्थ दोन्ही देशांनी लढाई थांबवली आहे आणि भविष्यात शस्त्रसंधीच्या माध्यमातून शांततेचा प्रयत्न करणार आहेत. हा करार तात्पुरता किंवा कायमस्वरूपी असू शकतो आणि त्याचा अर्थ दोन्ही देशांमध्ये चर्चा आणि संवाद वाढण्याची शक्यता आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम, शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या A टू Z माहिती
india vs pak 3
| Updated on: May 11, 2025 | 11:47 AM
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती सध्या निवळत चालली आहे. सध्या जम्मू काश्मीर, अमृतसर, जैसलमेरमधील परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येत आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झालं असून, भारतानं अधिकृत पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. या घोषणेनंतर ‘शस्त्रसंधी’ (Ceasefire) म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काय आहे शस्त्रसंधी?

शस्त्रसंधी किंवा युद्धविराम म्हणजे युद्धात दोन्ही बाजूंनी लढाई थांबवण्यासाठी केलेला एक करार. हा करार कायमस्वरूपी किंवा तात्पुरता असू शकतो. बहुतेक वेळा हा दोन्ही देशांमधील औपचारिक कराराचा भाग असतो. पण कधीकधी कोणताही लेखी करार नसतानाही दोन्ही देश अनौपचारिकरित्या शस्त्रसंधी स्वीकारू शकतात.

शस्त्रसंधी म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर करायचा नाही. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत, याचा अर्थ दोन्ही देशांनी आता शस्त्रहल्ले न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार एक प्रकारचा सामंजस्यातून झालेला आहे.

युद्धबंदी रेषा कधी निर्माण होते?

अनेकदा, प्रदीर्घ काळ युद्ध सुरु असेल तेव्हा दोन्ही पक्ष अशा स्थितीत पोहोचतात, जिथे कोणालाही पूर्ण विजय मिळवणं शक्य नसतं. तसेच कोणीही पूर्णपणे माघारही घेत नाही. यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्यात शस्त्रसंधी होते. ज्या ठिकाणी दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष सुरू असतो, ती जागा त्यांची प्रत्यक्ष सीमा बनते, जरी दोन्हीपैकी कोणताही देश त्याला अधिकृत सीमा मानण्यास तयार नसला तरी, अशा सीमांना ‘युद्धबंदी रेषा’ म्हणतात.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील युद्ध औपचारिकरित्या कधीच संपलेलं नाही, पण १९५३ मध्ये त्यांच्यात युद्धविराम रेषा निश्चित करण्यात आली होती. ती आजही त्यांची सीमा आहे. १९६५ च्या युद्धानंतर, काश्मीरमधील भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलाही युद्धविराम रेषा म्हटलं जाते. १९७१ च्या शिमला करारानंतर ती ‘नियंत्रण रेषा’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

शस्त्रविराम हा एक लष्करी करार

शस्त्रसंधीमध्ये दोन्ही देश एकत्र निर्णय घेतात. त्यानंतर ठरलेल्या जागेवर आणि वेळेसाठी सैन्य आपल्या सर्व हालचाली थांबवतं. याला एकतर्फी युद्धविराम असंही म्हणतात. यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये ही चर्चा १२ मे रोजी होणार आहे. कधीकधी चर्चेचा हा काळ खूप छोटा असतो, तर कधी तो दीर्घकाळ चालतो.

‘युद्धबंदी’ हा शब्दही अनेकदा वापरला जातो. शस्त्रविराम हा एक लष्करी करार आहे, ज्याचा मुख्य उद्देश युद्ध संपवणं हा शस्त्रसंधीचा मूळ उद्देष असतो. भारत-पाकिस्तान यांच्यातील ही शस्त्रसंधी कायम राहणार आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करणं हा यामागचा हेतू असतो.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.