मास्टरमाइंड हशिम मूसाला काश्मीरमधून काढण्याचा पाकिस्तानचा ‘नापाक’ प्लॅन, भारताची जिवंत पकडण्याची योजना
दहशतवादी अजूनही अनंतनाग जिल्ह्यात असल्याचा विश्वास तपास संस्थांना आहे. अनंतनागमधील जंगलांमध्ये असलेल्या गुफा त्यांच्यासाठी सुरक्षा कवच बनल्या आहेत. दहशतवाद्यांकडे १५ ते २० दिवस पुरेल इतका अन्नधान्य साठा आहे. तो संपल्यावर ते भूकेमुळे बाहेर पडतील.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींचा शोध भारतीय तपास संस्थांकडून सुरु आहे. हे दहशतवादी पहलगापासून 30 किलोमीटर परिसरात लपले असल्याचा संशय आहे. मास्टरमाइंड हशिम मूसासह इतर दहशतवादी काश्मीरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानकडूनही त्यांना बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहे. हे दहशतवादी गुफांमध्ये लपल्याची शक्यता आहे. आता या दहशतवाद्यांकडे फक्त काही दिवस पुरेल एवढेच अन्नसाठा शिल्लक राहिला आहे. यानंतर भूकेमुळे ते बाहेर पडतील. त्यांना घेरण्याची भारताची पूर्ण योजना राबवली जात आहे. २४ तास तपास संस्था त्यांचा शोध घेत आहे.
इस्त्रायलच्या एजन्सीची मदत
पाकिस्तान हँडलरकडून दहशवाद्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांसोबत संपर्क केला गेला आहे. परंतु त्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारताकडून सुरु असलेल्या मोहिमेमुळे त्या लोकांना बाहेर पडता येत नाही. भारतीय लष्कराने काही दिवसांत त्या दहशतवाद्यांना पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरु असलेले ऑपरेशन पूर्णपणे गुप्त ठेवले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी इस्त्रायलच्या एजन्सीची मदत घेतली जात आहे. आयएसआयकडून या हल्ल्यात सहभागी असलेला मास्टरमाइंड हाशिम मूसा याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कारण त्याला अटक झाल्यावर जगभरात पाकिस्तानची नाचक्की होणार आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद यांचे नाते उघड होणार आहे.
दहशतवाद्यांनी वापरलेला सॅटेलाइट फोनची माहिती जमा केली जात आहे. त्यासाठी विदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यावरुन आयएसआयच्या इशाऱ्यावरुन लश्कर ए तैयबाने हा हल्ला घडवला आहे. पहलगाम भागात २० एप्रिलनंतर सुरु असलेल्या सर्व मोबाइलचा तपास केला जात आहे.
दहशतवादी अजूनही अनंतनाग जिल्ह्यात असल्याचा विश्वास तपास संस्थांना आहे. अनंतनागमधील जंगलांमध्ये असलेल्या गुफा त्यांच्यासाठी सुरक्षा कवच बनल्या आहेत. दहशतवाद्यांकडे १५ ते २० दिवस पुरेल इतका अन्नधान्य साठा आहे. तो संपल्यावर ते भूकेमुळे बाहेर पडतील.
हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हत्याकांड घडवणारे दहशतवादी बैसरनमध्ये एक दिवस आधीच आले होते का, हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यांचे रेखाचित्र आणि छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यानंतर त्यांच्यासारखे काही संशयास्पद व्यक्ती दिसल्याचा दावा केला जात आहे. तपास यंत्रणांनी २१ एप्रिल रोजी बैसरन येथे उपस्थित असलेल्या घोडेस्वारांची, तसेच तेथे रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या आणि इतर सेवा देणाऱ्या लोकांची चौकशी केली आहे.
