अमेरिकेशी चर्चा फिस्कटली, आता दिल्लीवर चालून येणाऱ्या मिसाइल, फायटर जेट्ससाठी भारताने घेतला एक मोठा निर्णय
भारत सरकारने राजधानी दिल्लीवर चालून येणारे मिसाइल, फायटर जेट्स आणि ड्रोन्सचा सामना करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. याआधी दिल्लीच आकाश सुरक्षित करण्यासाठी भारताची अमेरिकेशी बोलणी सुरु होती. हा निर्णय काय आहे?

मिसाइल, ड्रोन आणि फायटर जेट्सपासून राजधानी दिल्लीच रक्षण करण्यासाठी भारताने स्वदेशीच्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. हवाई हल्ल्यापासून दिल्ली, NCR चं रक्षण करण्यासाठी भारत स्वेदशी मल्टी लेयर एअर डिफेन्स सिस्टिम तैनात करणार आहे. संरक्षण मंत्रालय वेगाने हा प्रोजेक्ट पुढे नेत आहे. इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिम (IADWS) ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची असेल. या सिस्टिममध्ये DRDO ने विकसित केलेले QRSAM मिसाइल आणि VSHORADS मिसाइल्स असतील. वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. IADWS सिस्टिमला अनेक प्रकारचे सेन्सर्स, रडार आणि आधुनिक कंट्रोल सिस्टिमने जोडलं जाईल. जेणेकरुन प्रत्येक धोक्यावर लक्ष ठेवता येईल. ही संपूर्ण सिस्टिम इंडियन एअर फोर्स ऑपरेट करणार आहे. IADWS ची 23 ऑगस्टला यशस्वी चाचणी झाली होती.
IADWS एक मल्टीलेयर एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ही सिस्टिम शत्रुचे हवाई हल्ले नष्ट करेल. ही सिस्टिम सुदर्शन चक्र मिशनचा भाग आहे. स्वॉर्म म्हणजे एकाचवेळी येणारे अनेक ड्रोन्स विरोधात ही सिस्टिम सुरक्षा कवच असेल. पीएम नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना मिशन सुदर्शन चक्रची घोषणा केली होती. त्यानंतर 23 ऑगस्टला ओदिशाच्या किनाऱ्यावर IADWS ची यशस्वी चाचणी करण्यात आली.
मोठं पाऊल मानलं जात आहे
भारत आधी राजधानी दिल्लीच्या हवाई सुरक्षेसाठी अमेरिकेकडून NASAMS-II सिस्टिम विकत घ्यायला इच्छुक होता. वॉशिंग्टन DC आणि व्हाइट हाऊसच्या सुरक्षेसाठी हीच सिस्टिम तैनात आहे. यासाठी चर्चा सुद्धा झाली. पण त्याचा खर्च भरपूर आहे. त्यानंतर सरकारने स्वदेशीचा वापर करायचं ठरवलं. हे पाऊल मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण सेक्टरसाठी मोठं पाऊल मानलं जात आहे.
चाचणी कशाप्रकारे झाली?
DRDO वर मिसाइल सिस्टमला रडार, डेटा लिंक आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टिमला जोडण्याची जबाबदारी असेल. अधिकाऱ्यांनुसार इतक्या जटिल एअर डिफेन्स व्यवस्थेला अनेक सिस्टिम सोबत एकत्र जोडणं गरजेच आहे. चाचणीच्यावेळी 2 हाय स्पीड फिक्स विंग अनमॅन्ड ड्रोन, मल्टी कॉप्टर ड्रोन सह तीन वेगवेगळ्या टार्गेटवर हल्ला करण्यात आला. हे तिन्ही टार्गेट वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर होते. IADWS ने या तिन्ही टार्गेट्सचा अचूक वेध घेत हवेतच ते नष्ट केले.
