Brahmos: भारताच्या निर्णयाचा चीनला बसणार तगडा झटका, भारत ‘या’ देशाला ब्रह्मोस मिसाईल देणार
भारत ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र चीनच्या शेजारील देश फिलीपिन्सला देणार आहे. भारताच्या या निर्णयाचा चीनला मोठा धक्का बसणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारताने गेल्या काही काळात संरक्षण क्षेत्रात शानदार प्रगती केली आहे. भारताच्या ताफ्यात शक्तिशाली ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या क्षेपणास्त्रांची ताकद संपूर्ण जगाने पाहिली आहे. या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारताने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले होते. आता भारत हे क्षेपणास्त्र चीनच्या शेजारील देश फिलीपिन्सला देणार आहे. फिलीपिन्सला आगामी काळात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची तिसरी खेप पाठवणार आहे. मात्र भारताच्या या निर्णयाचा चीनला मोठा धक्का बसणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत फिलीपिन्सला ब्रम्होस देणार
भारत आणि फिलीपिन्स यांच्यात 2022 मध्ये 375 दशलक्ष डॉलर्सचा करार झाला होता. याअंतर्गत भारत फिलीपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देण्याचे ठरले होते. करारानुसार भारताने या वर्षी क्षेपणास्त्रांची पहिली आणि नंतर दुसरी खेप फिलीपिन्सला पाठवली आहे. आता लवकरच भारत फिलीपिन्सला ब्रम्होसची तिसरी खेप पाठवणार आहे. ब्रह्मोस एरोस्पेस उपक्रमाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ जोशी यांनी, रॉकेट्स तयार आहेत. आम्ही ती वेळेवर पोहोचवू अशी माहिती एका वृत्त वाहिनीला दिली आहे.
चीन आणि फिलीपिन्समध्ये तणावाचे वातावरण
चीन आणि फिलीपिन्स यांच्यातील समुद्रातील तणाव वाढताना दिसत आहे. याच तणावाच्या काळात आता भारताकडून हे खतरनाक मिसाईल फिलीपिन्सला दिले जात आहेत. चीन फिलीपिन्सच्या ताब्यातील समुद्रावर आपला हक्क सांगत आहे, त्यामुळे याआधीही या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता फिलीपिन्स भविष्यातील धोका टाळण्यासाठी ब्रम्होस मिसाईल आपल्या किनारी भागात तैनात करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र का खास आहे?
ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक मिसाईल आहे. हे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडते. त्यामुळे शत्रूच्या रडारला ते सापडत नाही. त्यामुळे ब्रह्मोस अल्पावधित आपले टार्गेट गाठते. एकदा लॉन्च झाल्यानंतर या मिसाईलला कोणत्याही मानवी इनपुटची आवश्यकता नसते. या मिसाईलची रेंज 800 किलोमीटरपर्यंत आहे. या मिसाईलच्या मदतीने भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये रावळपिंडी, सरगोधा, भोलारी आणि नूर खान हवाई तळांवर निशाणा साधला होता. त्यामुळे आगामी काळात हे मिसाईल फिलीपिन्ससाठीही महत्वाचे ठरणार आहे.
