Corona Vaccine : भारताला ‘या’ आणखी 5 कोरोना लसी मिळणार, लसींचा तुटवडा संपणार?

Corona Vaccine : भारताला 'या' आणखी 5 कोरोना लसी मिळणार, लसींचा तुटवडा संपणार?
serum institute

देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. मात्र, ऐनवेळी कोरोना लसींचा पुरवठा कमी होत असल्याच्या आणि लसींचा तुटवडा तयार झाल्याची परिस्थिती तयार झालीय.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 11, 2021 | 9:11 PM

नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. मात्र, ऐनवेळी कोरोना लसींचा पुरवठा कमी होत असल्याच्या आणि लसींचा तुटवडा तयार झाल्याची परिस्थिती तयार झालीय. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या या लढाईत काहीसे अडथळे येत असल्याचं दिसतंय. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकार ऑक्टोबरपर्यंत देशात आणखी 5 कोरोना लसी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे या लसींमध्ये रशियाच्या स्पुतनिक लसीचाही समावेश आहे. सरकार ऑक्टोबरपासून कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही माहिती मिळतीय (India will have 5 more Covid vaccines by October according to Sources).

सूत्रांनी सांगितलं, “भारतात सध्या दोन कोरोना लसींचं उत्पादन होत आहे. यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश आहे. याशिवाय भारताला ऑक्टोबरमध्ये आणखी 5 कोरोना लसी उपलब्ध होतील. यात डॉ. रेड्डीसोबतच्या संयुक्त विद्यमाने रशियाची स्पुतनिक व्ही, बायोलॉजिकल ईच्या माध्यमातून जॉन्सन अँड जॉन्सन, सीरमच्या माध्यमातून नोव्हाव्हॅक्स, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेकची इंट्रासाल लसीचा समावेश आहे.”

विशेष म्हणजे रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला भारतात पुढील 10 दिवसांमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते. स्पुतनिक व्ही या कोरोना लसीची परिणामकारकता 92 टक्के इतकी आहे.

भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय

दुसरीकडे वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे आता देशातील रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा (remdesivir injection) पुवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (central government banned on export of injection remdesivir injection)

केंद्र सरकारचे कंपन्यांना निर्देश

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय

रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पुण्यात नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या, मित्रालाही अटक

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी घौडदोड, 1 कोटींचा टप्पा पार

व्हिडीओ पाहा :

India will have 5 more Covid vaccines by October according to Sources

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें