AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले.

राजस्थानच्या बाडमेरमध्ये हायवे झाला रनवे, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
भारतीय हवाई दलाचं विमान
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 09, 2021 | 12:54 PM
Share

जयपूर: केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानांसाठी राजस्थानच्या बाडमेर येथील राष्ट्रीय महामार्ग -925 वरील गंधव भकासर विभागावर आपत्कालीन लँडिंग रनवेचे उद्घाटन केले. हवाई दलाच्या विमानाने राष्ट्रीय महामार्गावर मॉक इमर्जन्सी लँडिंग केले यावेळी दोन्ही नेते विमानात उपस्थित होते. इंडियन एअर फोर्सचं सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान आणि C-130J सुपर हर्क्युलस विमानांचा यामध्ये समावेश होता.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा हवाई रनवे पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर आहे. भारत कोणत्याही आव्हानासाठी नेहमीच तयार असतो हे हवाई रनवेमुळे स्पष्ट होतं आहे. तीन किलोमीटर लांबीचा हा रनवे 19 महिन्यांत तयार करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळातही हे काम पूर्ण केले गेले आहे. या आपत्कालीन लँडिंग फील्डच्या बांधकामामुळे मनात उत्साह, सुरक्षिततेबद्दल आत्मविश्वासही निर्माण होत असल्यानं आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष दिवस आहे.

जनरल बिपीन रावत यांचीही उपस्थिती

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी राजस्थानच्या जालोर येथील राष्ट्रीय महामार्गावरील इमर्जन्सी फील्ड लँडिंगमध्ये लँडिंग प्रात्यक्षिक पाहिले.केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयाने बुधवारी ट्विटरवर पोस्ट करुन या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती.

राजनाथ सिंह MRSAM इंडक्शन फंक्शनमध्ये सहभागी होतील. जैसलमेरमध्ये तैनात असलेल्या हवाई दलाच्या जवानांशी राजनाथ सिंह संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग NH-925 चा वापर पहिल्यांदाच इंडियन एअर फोर्सच्या विमानाच्या आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

प्रकल्पाची किंमत 765.52 कोटी आहे

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंडियन एअर फोर्सच्या विमानाच्या आपत्कालीन लँडिंग सुविधा (ELF) म्हणून NH-925A च्या सट्टा-गंधव विभागाचा 3 किमीचा भाग विकसित केला आहे. गगेरिया-बख्सर आणि सट्टा-गंधव विभागाच्या नवीन विकसित दोन-लेन प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 196.97 किमी आहे. भारतमाला प्रकल्पाअंतर्गत या प्रकल्पाची किंमत 765.52 कोटी रुपये आहे. हवाई दलाची सर्व प्रकारची विमाने या रनवेवर उतरू शकतात.

युद्धाच्या काळात उपयुक्त ठरणार

राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या रनवेचा वापर युद्धाच्या काळात फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय तीन हेलिपॅडही तयार करण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या महामार्गाचे उद्घाटन करतील. हा रन वे युद्धाच्या वेळी हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या लँडिंगसाठी देखील वापरता येईल. युद्धादरम्यान, बहुतेक शत्रू हवाई दलाच्या हवाई तळाचा नाश करतात, अशा परिस्थितीत महामार्गावरील ही हवाई पट्टी हवाई दलाच्या विमानांसाठी खूप प्रभावी ठरणार आहे. केवळ बाडमेरमध्येच नाही, तर जैसलमेर जोधपूरमध्येही बनवण्यात आले आहे.

इतर बातम्या

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर, सणांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्यानं ऑनलाईन दर्शनाचा निर्णय : विजय वडेट्टीवार

बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का? शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांचा सवाल

Indian Air Force Emergency Landing Strip on highway Barmer of Rajasthan inaugurated Union Minister Rajnath Singh and Nitin Gadkari

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर