पाकिस्तान सीमेवर अचानक मोठी हालचाल, हाय अलर्ट जारी, नियंत्रण रेषेवर तब्बल..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढताना दिसतोय. पाकिस्तान भारताच्याविरोधात कुरापती करताना दिसत आहे. मोठी घुसखोरी करण्याचा प्रयत्न सीमेपलीकडून केला जात आहे. भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आहे.

आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर अर्थात एलओसीवर तणाव वाढल्याचे वृत्त समोर येत आहे. भारताने या भागात आपले सैन्य दुप्पट केल्याचे माहिती मिळतंय. मागच्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता एलओसीवरील हाचलाची वाढल्या आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा संस्था पूर्ण सतर्क आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये मोठा स्फोट झाला. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक भागातील सैन्य वाढवण्यात आले. हेच नाही तर सीमेवरील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सैनिकांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गस्त घालण्याचे क्षेत्र देखील दिवसरात्र सतत वाढविण्यात आले आहे, यावरून एक अंदाजा येईलच.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये 131 दहशतवादी सक्रिय आहेत. हैराण करणारे म्हणजे त्यापैकी तब्बल 117 हे पाकिस्तानी दहशतवादी असल्याची माहिती पुढे आलीये. 14 स्थानिक लोक असे आहेत, जे दहशतवाद्यांना लपण्यासाठी मदत करत आहेत. त्याचे पुरावेही काही मिळाली आहेत. मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आलीये.
सीमेपलीकडून कोणीही घुसखोरी करू नये, याकरिता सैनिकांची संख्या दुप्पट करण्यात आली. विशेष म्हणजे गस्तीवर फक्त पुरूषच नाही तर महिलांचीही संख्या लक्षणीय आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने अगदी जवळून ड्रोनचा वापर केला. यामुळे सर्व बाजुंनी लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती केल्या जाण्याचीही शक्यता असल्याचे सांगितेल जाते.
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय लोकांचा जीव गेला. धक्कादायक म्हणजे हल्ल्यात फक्त आणि फक्त हिंदू लोकांनाच टार्गेट करण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर मोठा स्फोट दिल्लीतील लाल किल्ला परिसरात जैशच्या दहशतवाद्यांनी केला. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान काही मुस्लिम देशांना हाताशी धरून भारतावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. त्यामध्येच भारतानेही घुसखोरी टाळण्यासाठी सीमेवर अलर्ट जारी केला असून सीमेवर तणावाचे वातावरण आहे.
