INS Mahe : भारत आता पाकिस्तानला समुद्राच्या पोटातही घुसून मारणार, कारण आपल्याकडे आली INS माहे, हे अस्त्र किती घातक?
INS Mahe : भारतीय नौदलाला आज गमेचेंजर अस्त्र मिळालं आहे. भारताविरोधात सतत कटकारस्थान रचणाऱ्य चीन-पाकिस्तानसाठी हा मोठा इशारा आहे. INS माहे आपल्याकडे आली आहे. काय आणि किती घातक आहे हे समुद्री अस्त्र? समजून घ्या.

भारतीय नौदलाच्या समुद्री शक्तीमध्ये आज आणखी मोठी वाढ होईल. त्याचं कारण आहे INS माहे. सोमवारी मुंबई येथील नौदल गोदीत हे पाणबुडी विरोधी जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. INS माहे हे ‘सबमरीन हंटर’ जहाज आहे. म्हणजे शत्रुची पाणबुडी खोल समुद्रात असो वा उथळ पाण्यात तिला शोधून नष्ट करण्याची INS माहेची क्षमता आहे. आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत INS माहेची निर्मिती करण्यात आली आहे. यात 80 टक्के स्वदेशी उपकरणं आहेत. INS माहे समुद्री सुरक्षेत गेम चेंजर ठरेल. अरबी समुद्रापासून ते हिंद महासागरापर्यंत भारताची समुद्री सीमा पसरलेली आहे. या सीमेच्या प्रत्येक इंचाच रक्षण करण्यासाठी नौदलाला आज नवीन ताकद मिळणार आहे. आज 24 नोव्हेंबरला मुंबईच्या नेवल डॉकयार्डमध्ये हे अत्याधुनिक ASW क्राफ्ट राष्ट्राला समर्पित केलं जाईल.
माहे क्लासचं पहिलं सबमरीन हंटर जहाजं आहे. अधिकृतरित्या भारतीय समुद्री सीमेच्या रक्षणासाठी ते तैनात होईल. कोचीन शिपयार्डमध्ये बनवण्यात आलेली ही युद्धनौका फक्त टेक्नोलॉजीची कमाल नाही तर यात 80 टक्के स्वदेशी उपकरणं बसवलेली आहेत. आत्मनिर्भर भारताचा हा सर्वाधिक ताकदवर समुद्री संदेश आहे.
अशी अजून किती जहाजं नौदलाला मिळणार?
INS माहे 78 मीटर लांब आणि जवळपास 1,150 टन वजनाचं जहाज आहे. पाण्याखालील कुठलाही धोका क्षणार्धात संपवणारी ही सबमरीन किलर आहे. माहे क्लासच्या अशा 16 ASW Water Craft भारतीय नौदलासाठी बनवण्याची योजना आहे. यातील 8 जहाजं ही एंटी-सबमरीन स्पेशलाइज्ड असतील. INS MAHE त्या श्रृंखलेतील पहिलं जहाज आहे. दर सहा-सहा महिन्यांनी या क्लासची जहाजं नौदलाला सोपवली जातील. ही सर्व जहाजं 2029 पर्यंत नौदल सेवेत रुजू होतील.
या जहाजाची क्षमता काय?
INS Mahe ची सर्वात मोठी क्षमता याची डुअल-सोनार क्षमता आहे. एक डीप वॉटरसाठी आणि दुसरी शॅलो वॉटरसाठी आहे. म्हणजे शत्रुची पाणबुडी खोल समुद्रात असो किंवा किनाऱ्याजवळ. INS Mahe ती पाणबुडी शोधून काढायला सक्षम आहे. हे जहाज आधुनिक डिटेक्शन सिस्टिम, दोन सोनार आणि उन्नत सेन्सर्सनी सज्ज आहे. कुठल्याही समुद्राच्या पृष्ठभागावरील आणि पाण्याखालील टार्गेटला कमी वेळात ट्रॅक,लॉक आणि संपवण्याची क्षमता आहे.
भारताच्या समुद्री सीमेजवळ लपून राहणं कठीण
VO-INS Mahe च्या तैनातीमुळे फक्त भारताची सुरक्षा वाढणार नाही, तर हिंद महासागरात सक्रीय असलेल्या चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांसाठी हा एक मोठा इशारा आहे. अरबी समुद्र असो किंवा दक्षिण मध्य समुद्री सीमा भारताने स्पष्ट संदेश दिलाय की, आता कुठलीही सबमरीन भारताच्या समुद्री सीमेजवळ आसपासून लपून राहू शकत नाही.
