Falaknuma Express train accident: मोठा अपघात होता होता टळला; चालत्या ट्रेनच्या तीन बोगी वेगळ्या झाल्या

Falaknuma Express train accident: मोठा अपघात होता होता टळला; चालत्या ट्रेनच्या तीन बोगी वेगळ्या झाल्या
faluknuma express accident
Image Credit source: TV9

 शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास फलकनुमा एक्स्प्रेस बेल्दा स्थानकावरून ओरिसाच्या दिशेने येत असताना दंतन गेटच्या मध्यभागी काही आवाज येत असल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. त्यानंतर मुख्य ट्रेनपासून तीन बोगी वेगळ्या झाल्याचे त्यांना दिसून आले. आणि त्यांनी तात्काळ रेल्वे थांबवून काही काळानंतर रेल्वेचे डब्बे जोडण्यात आले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 26, 2022 | 7:14 PM

बेलदाः बेलदा स्टेशनवरुन (Belda Station) निघालेल्या फलकनुमा एक्सेप्रेसचा मोठा अपघात होता होता टळला. मोटरमनने लक्ष दिल्याने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास फलकनुमा एक्सप्रेस (Falaknuma Express) बेलदा स्टेशनपासून ओरिसाच्या (Odisha) दिशेने जात असताना रेल्वेच्या मोटरमनला काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर दंतन गेटच्या जवळ कसला तरी आवाज आल्याचेही मोटरमनला जाणवले. म्हणून ज्यावेळी त्या आवाजाच्या दिशेन पाहण्यात आले त्यावेळी लक्षात आले की, मुख्य रेल्वेच्या डब्यापासून गाडीच्या तीन बोगी वेगळ्या झाल्या आहेत. त्यानंतर तात्काळ गाडी थांबवून चाळीस मिनिटानंतर रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.

हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्स्प्रेसचा शनिवारी मोठा अपघात होता होता टळला. ही एक्स्प्रेस चालू असतानाच शनिवारी चालत्या ट्रेनचे तीन डबे वेगळे झाले, सुदैवान यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. मेदिनीपूरमधील बेलदा स्थानकाजवळ ट्रेन थांबली होती, त्या स्टेशनवर ट्रेन चाळीस मिनिटे थांबल्यानंतर ती पुन्हा मार्गस्थ झाली. मात्र काही वेळातच फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन बोगी अचानक वेगवेगळ्या झाल्या.

रेल्वेच्या 25 पैकी तीन बोगी वेगळ्या

मेदिनीपूर जिल्ह्यातील खरगपूर विभागातील बेलदा स्टेशनजवळ ही घटना घडली. रेल्वेची ही घटना घडल्यानंतर स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालत्या ट्रेनच्या तीन बोगी वेगवेगळ्या झाल्यानंतर 25 पैकी तीन बोगी वेगळ्या करण्यात आल्या होत्या. मात्र या घटनेमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

तज्ज्ञांकडून रेल्वेची पाहणी

या दुर्घटनेनंतर रेल्वेचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर रेल्वेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर चाळीस मिनिटानंतर रेल्वेच्या तज्ज्ञांनी रेल्वेची सगळी पाहणी करुन ट्रेन पुन्हा हावडाकडे मार्गस्थ केली.

मध्यभागी काही तरी आवाज

या घडलेल्या दुर्घटनेबद्दल मिळाली माहित अशी की, शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फलकनुमा एक्स्प्रेस बेलदा स्थानकावरून ओरिसाच्या दिशेने येत होती. त्यावेळी दंतन गेटच्या मध्यभागी काही तरी आवाज येत असल्याचे रेल्वे मोटरमनच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी बारकाव्याने लक्ष देऊन पाहिल्यानंतर लक्षात आले की, मुख्य इंजिनपासून तीन बोगी वेगळ्या झाल्या आहेत.

काही काळ गोंधळ

बोगी वेगळ्या झाल्याचे लक्षात येताच काही काळ तेथे गोंधळ माजला. मुख्य इंजिनपासून वेगळ्या झालेल्या बोगींची पाहणी करुन ती समस्या सोडवून ही ट्रेन पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. यावेळी रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की, यांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीबीसीचे कुलूप उघडले होते. त्यामुळे ही घटना घडली, मात्र कोणतीही मोठी दुर्घटना यामुळे झाली नाही.

तीन बोगी वेगळ्या करण्यात आल्या

फलकनुमा एक्स्प्रेसच्या मुख्य डब्यापासून वेगळ्या झालेल्या बोगीमुळे गोंधळ उडाला होता, ही घटना ज्या पूर्णा दास यांनी पाहिली त्यांनी सांगितले की, “सिकंदराबाद हावडा फलकनुमा एक्स्प्रेसच्या तीन बोगी रेल्वे फाटकाजवळ आल्यानंतर वेगळ्या झाल्या. यावेळी वेगळ्या झालेल्या या बोगी गार्डने पाहता क्षणीच त्यांनी मोटरमनला सांगितले. यावेळी रेल्वे थांबवून मुख्य मोटरमनला बोलवण्यात आले. त्यानंतर डब्यांची आणि इंजिनची पाहणी करुन वेगळ्या झालेल्या बोगी जोडण्यात आल्या. या घटनेनंतर असेही बोलले जात आहे की, लक्ष गेले नसते तर मोठा अपघात झाला असता. सीबीसी कुलूपमध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

Vivek Agnihotri यांचा पाय खोलात, “भोपाळी म्हणजे समलैंगिक!” वादग्रस्त विधान भोवलं, तक्रार दाखल

चीनच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करताय, UGC नं विद्यार्थ्यांना दिलेला इशारा नक्की वाचा

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें