AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा बालेन शाहा यांना मोठा झटका, एका निर्णयामुळे नेपाळ मोठ्या संकटात, सरकारची तातडीची पत्रकार परिषद

मोठी बातमी समोर येत आहे, बालेन शाहा यांनी सत्तेत आल्यानंतर भारताविरोधात काही निर्णय घेतले होते. मात्र आता भारतानं घेतलेल्या एका निर्णयाचा नेपाळला मोठा फटका बसला आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

भारताचा बालेन शाहा यांना मोठा झटका, एका निर्णयामुळे नेपाळ मोठ्या संकटात, सरकारची तातडीची पत्रकार परिषद
balen shah Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 7:05 PM
Share

बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर नेपाळच्या परराष्ट्र धोरणामध्ये मोठा बदल पहायला मिळत आहे. विशेष: बालेन शाह यांनी असे काही निर्णय घेतले जे भारताविरोधात जाणारे होते. बालेन शाह यांनी पंतप्रधान होताच भारतामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता, या निर्णयानुसार भारतामधून 100 रुपंयापेक्षा जास्त किमतीच्या आयात वस्तूंवर नेपाळमध्ये शुल्क लावण्यात आलं. मात्र बालेन शाह यांच्या या निर्णयाला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला. एवढंच नाही तर बालेन शाह यांच्याकडून लिपूलेखवर देखील दावा करण्यात आला होता, तसेच भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहनांवर देखील टोल आकारला जात आहे. या वाहनांना नेपाळमध्ये अस्थायी वाहन नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची आहे.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताच्या एका निर्णयामुळे नेपाळमध्ये मोठा हाहाकार उडाला आहे. भारत सरकारने गेल्या आठवड्यात साखरेच्या निर्यातीला अचानक ब्रेक लावला. भारत सरकारच्या या निर्णयानुसार आता सप्टेंबर 2026 पर्यंत कोणत्याही प्रकारची साखर निर्यात करता येणार नाहीये. साखरेचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारताने घेतलेल्या या निर्णयाचा नेपाळवर मोठा परिणाम झाला आहे.

नेपाळचं वृत्तपत्र माय रिपब्लिकाच्या एका रिपोर्टनुसार नेपाळ भारताकडून मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करतो. एकीकडे भारताने आता साखरेची निर्यात बंद केली आहे, तर दुसरीकडे भरीस भर म्हणजे नेपाळमधील साखरेच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नेपाळ पूर्वी सरासरी1 लाख 55 हजार टन एवढं साखरेचं उत्पादन करत होता, मात्र यंदा नेपाळने 1 लाख 20 हजार टन एवढंच साखरेचं उत्पादन केलं आहे. त्यामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तिहार, छठ या सारख्या सणांच्या काळात नेपाळमध्ये साखरेला मोठी मागणी असते, त्यामुळे आता नेपाळची चिंता वाढली आहे.

एका रिपोर्टनुसार नेपाळला दर महिन्याला सरासरी 20 हजार ते 25 हजार टन एवढ्या साखरेची गरज असते, हे गणित पहाता पुढील 6 महिन्यांत नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. भारताने साखर निर्यात बंद केल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नोपाळच्या अन्न पुरवठा मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन तेथील नागरिकांना असा भरोसा दिला आहे की, जरी भारताने साखर निर्यात बंद केली असली तरी पुढील 8 महिने पुरेल एवढा साखरेचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र समोर आलेल्या माहितीप्रमाणे पुढील 6 च महिन्यांमध्ये नेपाळला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ