AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी भारताने नेपाळचं नाक दाबलंच, बालेन शाहा यांना मोठा झटका, एका निर्णयानं देशात मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, बालेन शाहा नेपाळचे पंतप्रधान झाल्यापासून नेपाळ सरकारकडून भारताविरोधात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. त्यानंतर आता भारत सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे नेपाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शेवटी भारताने नेपाळचं नाक दाबलंच, बालेन शाहा यांना मोठा झटका, एका निर्णयानं देशात मोठी खळबळ
balen shah Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 15, 2026 | 4:52 PM
Share

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्ता परिवर्तन झालं आहे. सत्ता परिवर्तनानंतर बालेन शाहा हे नेपाळचे नवे पंतप्रधान झाले आहेत. बालेन शाहा हे नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत. परंतु यातील अनेक निर्णय भारताविरोधात असल्याचं पहायला मिळत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाहा यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तुंवर शुल्क लावण्याची घोषणा केली. भारतामधून आयात होणाऱ्या 100 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या प्रत्येक वस्तूवर नेपाळकडून आयात शुल्क लावण्यात आले. दरम्यान याचा मोठा फटका हा सीमावर्ती भागातील व्यापाराला बसला. सीमावर्ती भागातील व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. त्यानंतर बालेन शाह यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहनांवर देखील टोल लावला आहे.

भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या वाहणांसदर्भात आता नेपाळ सरकारने आपलं धोरण अधिक कडक केलं आहे. जे वाहन नेपाळमध्ये जाणार आहेत, त्या वाहनाच्या चालकाला ओळख पत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर अशा सर्व वाहनांना क्यूआर कोड स्कॅन करून अस्थाई वाहन म्हणून नोंदणी करावी लागणार आहे, ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची तसेच किचकट आहे. एवढंच नाही तर बालेन शाहा यांनी लिपूलेखवर देखील दावा केला होता. त्यामुळे या सर्व निर्णयामधून बालेन शाहा यांची भारतविरोधी भूमिका समोर येत आहे.

दरम्यान आता भारताने नेपाळला मोठा धक्का दिला आहे. भारताने देशांतर्गत साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत पांढरी तसेच रिफाइंड साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयामुळे आता नेपाळ नव्या संकटात सापडला आहे. नेपाळ साखरेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. सण उत्सवाच्या काळात नेपाळला मोठ्या प्रमाणात साखरेची गरज असते, त्यामुळे आता नेपाळमध्ये साखरेचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता असून, साखरेची किंमत चांगलीच भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता बालेन शाहा सरकारने आवश्यक ती पाऊले उचलण्याची तयारी सुरू केली असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात