भारताचा सर्वात श्रीमंत मुस्लीम उद्योजक,ज्याच्या वडिलांना पाकिस्तानने आमंत्रण दिले होते,दर दिवशी करतात 270000000 दान
साल १९४७ मध्ये फाळणीनंतर जेव्हा दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली तेव्हा मुस्लीमांचे स्वतंत्र राष्ट्र घोषीत झाले तेव्हा पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जीन्नाह यांनी त्यांना मानाने बोलावले होते, पण त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला...

जेव्हा भारतातील अब्जाधीश व्यावसायिकांची चर्चा सुरु होते तेव्हा अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांची नावे आधी घेतली जातात. परंतू एक मुस्लीम उद्योजक ज्याचा दबदबा इतका होता की भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा त्यांना पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जीन्नाह यांनी पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले होते. हा बिझनेस दर दिवशी 27,0000000 रुपये दान करतो. आपण बोलत आहोत आयटी जायंट विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांच्या वडील मोहम्मद प्रेमजी यांच्याबद्दल बोलत आहोत.
ब्लुमबर्ग बिल्येनियर्स इंडेक्सनुसार अझीम प्रेमजी यांची संपत्ती २७.९ अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजे सुमारे २,३०,७४० कोटी इतक्या संपत्तीचे ते मालक आहेत. ते दरदिवशी इतकी संपत्ती दान करतात जितकी भारतातील एखादा व्यक्ती कमाविण्याचे स्वप्नच पाहू शकतो. प्रेमझी यांची फॅमिली दर दिवसाला २७ कोटी रुपये इतके दान करते.
साल १९४७ मध्ये फाळणीनंतर जेव्हा दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली तेव्हा मुस्लीमांचे स्वतंत्र राष्ट्र घोषीत झाले तेव्हा पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जीन्नाह यांनी अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद प्रेमजी यांना पाकिस्तानात येऊन स्थानिक होण्याची ऑफर दिली होती.प्रेमझी यांच्या वडील मोहम्मद प्रेमजी यांनी भारतातच आपण राहाणार हे जीन्नाह यांना सांगितले.
अझीम प्रेमजी यांच्या वडिल मोहम्मद प्रेमजींनी पाकिस्तानला जाण्याचे निमंत्रण नाकारले, तर त्यांचे मोठे भाऊ फारुख प्रेमजी यांनी १९६५ मध्ये ते पाकिस्तानात जाण्याचा निर्णय स्वीकारले. लग्नानंतर ते त्यांच्या कुटुंबासह पाकिस्तानात स्थलांतरित झाले. त्यानंतर अवघ्या एका वर्षानंतर, मोहम्मद प्रेमजी यांचे निधन झाले, ज्यामुळे अझीम प्रेमजी यांना अमेरिकेतील शिक्षण सोडून भारतात परतावे लागले. परतल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हाती घेतला आणि भारतीय व्यावसायिक म्हणून जगात एक मोठी आयटी कंपनी स्थापना केली.
अझीम प्रेमजी त्यांच्या उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी शिवाय त्यांच्या दानधर्म आणि चॅरिटीसाठी टळकपणे ओळखले जातात. एडेलगिव्ह हुरुन इंडिया चॅरिटी लिस्ट २०२१ नुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात त्यांनी ९,७१३ कोटी रुपये किंवा दररोज २७ कोटी रुपये दान केले आहेत.
२२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत, अझीम प्रेमजी हे भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लीम उद्योजक आहेत, त्यांची एकूण संपत्ती १२.२ अब्ज डॉलर्स आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, ते भारतातील १९ वे आणि जागतिक स्तरावर १९५ वे श्रीमंत व्यक्ती आहेत.
