AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिगो फ्लाईटचे एमर्जन्सी लँडिग! पायलटच्या त्या कृतीचे होतंय कौतुक, नेमकं काय घडलं?

एमर्जन्सी लँडिंगमुळे हे विमान सुमारे ५० मिनिटे जबलपूर विमानतळावर उभे होते. त्यानंतर विमानाने रांचीसाठी उड्डाण केले. आता एमर्जन्सी लँडिंग का करण्यात आले? जाणून घ्या..

इंडिगो फ्लाईटचे एमर्जन्सी लँडिग! पायलटच्या त्या कृतीचे होतंय कौतुक, नेमकं काय घडलं?
indigoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 23, 2026 | 3:05 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी विमानचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कधी विमानातील बिघाडामुळे तर कधी धावपट्टीवरील अडचणींमुळे अनेकदा एमर्जन्सी लँडिंग करावे लागले. पण नुकताच एक अशी घटना समोर आली आहे जिची देशभरात चर्चा होत आहे. विमान प्रवासादरम्यान एका तरुणाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. ते पाहून इंडिगो फ्लाइटच्या पायलटने मोठा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

उड्डाणादरम्यान विमानात सवार एका २९ वर्षीय प्रवाशाची तब्येत अचानक अत्यंत बिघडली. तो फुफ्फुसाच्या (लंग्स) आजाराच्या उपचारासाठी आपल्या बहिणीसोबत अहमदाबादला गेला होता आणि तिथून परतत होता. विमान जेव्हा जबलपूरच्या आकाशात होते, तेव्हा त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पायलटने तातडीने डुमना एअरपोर्टच्या एटीसीशी (ATC) संपर्क साधला आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.

विमान लँड होताच एअरपोर्ट प्रशासन आणि विमान कंपनीने तातडीने रुग्णवाहिका (एम्ब्युलन्स) बोलावून रुग्णाला जबलपूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही रात्री उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला.

५० मिनिटे विमान उभे

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे हे विमान जेव्हा डुमना एअरपोर्टच्या वरून जात होते, तेव्हाच ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदीप कुमार गौनिश (रा. रांची, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल) यांची तब्येत विमान प्रवासादरम्यान खालावली होती. त्यांच्या उपचारासाठीच पायलटने विमान जबलपूर विमानतळावर उतरवले. इमर्जन्सी लँडिंगमुळे हे विमान सुमारे ५० मिनिटे जबलपूर विमानतळावर उभे होते. त्यानंतर विमानाने रांचीसाठी उड्डाण केले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल