AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंगरावर चढताना सुपारी किलर्स थकले, हत्येला दिला नकार, सोनम ओरडून म्हणाला, 20 लाख देते, Kill Raja

Indoor Raja Raghuvanshi Murder : इंदूरचा राजा रघुवंशी खूनप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. डोंगरावर सुपारी किलर्स पाठलाग करत थकून गेले. तेव्हा क्रूर सोनमने त्या खुन्यांना पैशांचे आमिष दाखवून हा खून घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे.

डोंगरावर चढताना सुपारी किलर्स थकले, हत्येला दिला नकार, सोनम ओरडून म्हणाला, 20 लाख देते, Kill Raja
राजाच्या खुनातील भयानक वास्तवImage Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jun 10, 2025 | 11:49 AM
Share

इंदूरचा राजा रघुवंशी खून प्रकरणात मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राजा याला अटक करण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणात एका मागून एक खुलासे होत आहे. हा खून करणाऱ्या तीन सुपारी किलरला सुद्धा अटक करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, मेघालय येथील शिलाँगचा डोंगर चढताना सुपारी किलर्स थकले होते. त्यांनी राजाची हत्या करण्यास मनाई केली. पण त्याला ठार करा असे सोनम ओरडत होती. तिने त्यासाठी किलर्सला पैशांचे आमिष दाखवले. यापूर्वी खूनासाठी जी रक्कम ठरवली होती. त्यात तिने 40 पट वाढ केली.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, 23 मे रोजी फोटोशूट करण्याच्या बहाण्याने सोनम ही राजाला एकदम निर्जन डोंगर रांगाकडे घेऊन गेली. चढताना ती मधातच थांबली. तिने राजाला पुढे पाठवले आणि त्याच्या मागोमाग तीनही सुपारी किलर्सला पाठवले. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा तिने ओरडून सांगितले की याला ठार करा. त्यानंतर आरोपी विशाल चौहान याने राजाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. तर या भागात दुसरा आरोपी आकाश राजपूत हा बाईकवर घडामोडींवर लक्ष ठेवत होता.

आरोपींनी सांगितला तो थरार

आरोपींनी पोलिसांना खूनाचा घटनाक्रम सांगितला. त्यानुसार ते डोंगरावर चढता चढता थकले होते. तेव्हा सोनमने त्यांना 20 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. तर त्याचवेळी तिच्याकडे असलेल्या राजच्या पाकिटातून तिने 15 हजार रुपये काढून त्यांना दिले. राजा याच्या खुनाची सुपारी 50 हजाराची होती. पण आरोपींनी खून करणार नसल्याचे सांगितल्यावर सोनमने लागलीच 20 लाख देणार पण राजाचा खून करा असे सांगितले.

राजाच्या अंत्यविधीतही राज

राजाच्या अंत्यविधीत आरोपी राज कुशवाह हा हजर होता. इतकेच नाही तर तो राजाचे सासरे देवी सिंह यांचे सांत्वन करत होता. त्याचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे. या व्हिडिओत राज कुशवाह हा एकदम भावनिक दिसून येत आहे. तो देवी सिंह यांचे सांत्वन करताना दिसून येत आहे.

Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल