दिल्लीचा राजमार्ग बिहारमधून जाणार..नितीश यांच्या रणनीतीपुढे भाजप बेजार..

भाजपला देशात फक्त भाजप, संघ आणि त्यांचे मित्रपक्ष तेवढेच शिल्लक ठेवायचे आहेत आणि बाकीच्या गोष्टी त्यांना संपवायच्या आहेत.

दिल्लीचा राजमार्ग बिहारमधून जाणार..नितीश यांच्या रणनीतीपुढे भाजप बेजार..
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 6:09 PM

नवी दिल्लीः आगामी निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) विरोधकांनी जोरदार तयारी केली असली तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मात्र आता कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांना अनेक दिग्गज नेत्यांचीही साथ मिळत आहे. हरियाणमध्ये बोलताना नितीश कुमारांनी (Bihar CM Nitish Kumar) म्हटले आहे की, देशातील विरोधी पक्ष एकत्र आल्यास 2024 मध्ये भाजपचा पराभव करणे सहज साध्य असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपवर टीका करताना सांगण्यात आले की, बिहारमधील निवडणुकीत भाजपकडून आमच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र ते शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने मागासलेल्या राज्यासाठी जे आश्वासन दिले होते, ते त्यांच्याकडून पूर्ण झालेच नाही.

माजी उपपंतप्रधान आणि आयएनएलडीचे संस्थापक चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त हरियाणातील फतेहाबादमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये शरद पवार, सीताराम येचुरी, सुखबीर बादल, के. सी. त्यागीही सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना नितीश कुमार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये असून त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांविरोधात असणाऱ्या सर्वांना एकत्र येण्यासाठी थोडा वेळ लागेल मात्र अधिकाधिक लोक एकत्र आले तर मात्र विरोधकांची मोठी फळी तयार होऊन भाजपला मात देता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशातील राज्या राज्यातील पक्ष भाजपच्या विरोधात लढले तर ते कुठूनच जिंकू शकणार नाहीत.यावेळी त्यांनी पंतप्रधान होण्याच्या प्रश्नावर मात्र नकार देत मी विरोधकांची मोट बांधत असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीश कुमार म्हणाले की, मी काँग्रेससह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहे तरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे.

यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की, संयुक्त जनता दल , शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना या पक्षांनी एकत्र येत लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत भाजप हा सगळ्यात खोटा बोलणारा पक्ष असल्याची टीकाही त्यांनी जोरदार केली.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत शहरात एकही विमानतळ नाही मात्र अमित शहांनी पूर्णिया जिल्ह्यात विमानतळ करण्याचे अश्वासन दिले आहे असा उपरोधिक टोलाही त्यांना लगावला.

या सर्वांनी संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सत्ताधारी आघाडी सोडल्याचा दावा तेजस्वी यांनी केला आहे. एकीकडे बिहार सरकारने लोकांना नोकऱ्या देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

या सभेत तेजस्वी यादवांनी शेतकऱ्यांचे आभार मानत त्यांनीच आरएसएसला आणि भाजपला धडा शिकवला असल्याचे म्हटले आहे.

भाजपला देशात फक्त भाजप, संघ आणि त्यांचे मित्रपक्ष तेवढेच शिल्लक ठेवायचे आहेत आणि बाकीच्या गोष्टी त्यांना संपवायच्या असल्याची जोरदार टीकाही तेजस्वी यादवांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.