AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योती मल्होत्रा पुरती फसली, हाती लागले खळबळ उडवून देणारे पुरावे; नेमकं काय मिळालं?

यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर हेरगिरीचे आरोप आहेत. तिला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ज्योती मल्होत्रा पुरती फसली, हाती लागले खळबळ उडवून देणारे पुरावे; नेमकं काय मिळालं?
jyoti malhotra
| Updated on: May 26, 2025 | 9:13 PM
Share

Jyoti Malhotra : मूळची हरियाणाची यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानीसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. भारतातील वेगवेगळ्या तपास संस्थांनी आतापर्यंत तिची चौकशी केली आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्रा हिला न्यायालयाने आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. असे असतानाच आता तिच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांबाबत मोठी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिच्याजवळचे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं तसेच डिजिटल अकाऊंट्समधून 12 टेराबाईट डेटा जप्त करण्यात आला आहे.

तब्बल 12 टेराबाईट डेटा मिळाला

तपास संस्थांनी काही दिवसांपूर्वी ज्योतीचे मोबाईल, लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक सामान जप्त केले होते. याच सामानातून तब्बल 12 टेराबाईट डेटा मिळवण्यात आला आहे. यामध्ये चॅटिंगचे रेकॉर्ड्स, कॉल लॉग्स, व्हिडीओ फुटेज, आर्थिक व्यवहार तसेच अन्य माहिती आहे. याच डेटाचा उपयोग करून तपास संस्थांना तिच्याविरोधात अनेक पुरावे मिळण्याची शक्यता आहे. या डेटाची मदत घेऊन ज्योती खरंच हेरगिरीच्या प्रकरणात सामील आहे का? ती पाकिस्तानच्या कोणा-कोणाशी संपर्कात होती, याची माहिती मिळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पाकिस्तानमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट

दुसरीकडे ज्योती मल्होत्रा ही आयएसआयशी संबंध असलेल्या मूळच्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या चार जणांच्या थेट संपर्कात होती. ज्योतीने पाकिस्तानला भेट दिली होती. या भेटीत तिला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाली होती. ती रस्त्यावर फिरत असताना तिच्याभोवती सहा-सहा बंदुकधारी उभे होते. या लोकांच्या हातात एके-47 बंदुका होत्या. त्यामुळेही ज्योती मल्होत्राची पाकिस्तानमध्ये एवढी पोहोच कशी, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

दरम्यान, ज्योतीजवळ असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांतून मिळवलेल्या 12 टीबी डेटामध्ये काही पुरावे आढलले तर तिला शिक्षेपर्यंत घेऊन जाणे सोपे होईल. तसेच न्यायालय अशा प्रकारचे डिजिटल पुरावे ग्राह्य धरतं असं पोलिसाचं मत आहे.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.